Surgana

देशभरात कोरोना सारख्या विषाणुचा थैमान असतांना सुध्दा  सुरगाणा शहरात नगरपंचायतकडुन नळाद्वारे सोडले जाते दुषित व गढुळ पाणी

देशभरात कोरोना सारख्या विषाणुचा थैमान असतांना सुध्दा सुरगाणा शहरात नगरपंचायतकडुन नळाद्वारे सोडले जाते दुषित व गढुळ पाणी

विजय कानडे

देशभरात कोरोना सारख्या विषाणुचा भैमान असतांना देखील सुरगाणा शहारातील नागरिकांना नगरपंचायतीकडुन दुषित व गढुळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे.या दुषित व गढुळ पाण्यामुळे अनेक नागरिकांना उलट्या, मळमळ, जुलाबसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. तरी हे दुषित व गढुळ असलेले पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. आता पुढच्या महिन्यापासुनच पावसाळा सुरु होणार असल्यानेही समस्या आणखीच गंभीर होण्याची शक्यता आहे. तरी पावसाळा सुरु होण्यापुर्वी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे लिकेज काढणे,व्हॅालभोवती कठडा बांधणे तसेच पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याबाबत योग्यती कार्यवाही नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी करावी अशी मागणी सुरगाणा शहारातील नागरिकांकडुन होत आहे.

तसेच सुरगाणा नगरपंचायतचे वार्षिक ऑडिट करण्य‍ासाठी वरिष्ठांनी चांगल्या व प्रामाणिक अधिकार्‍याची नेमणुक करावी.जेणेकरुन नगरपंचायतकडुन नळाद्वारे बारामाही दिल्या जाण्यार्‍या पाण्याचा व इतर सर्व बाबींचा पडदाफाश होईल.
या सर्व बाबींकडे सुरगाणा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष घालावे तसेच या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेतली नाही तर प्रबंधभुमी न्युज कडुन सतत पाठपुरवठा केला जाईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button