पंढरपुर शहर पोलीसांकडुन घरफोडी करणारी महिला आरोपीस जेरबंद
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपुर शहर पोलीसांकडुन घरफोडी करणारी महिला आरोपीस जेरबंद
2 लाख 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
फिर्यादी नामे गुलाब दिगंबर पोरे , रा. प्लट नं 48, बसवेश्वरनगर, ईसबावी, पंढरपुर, ता पंढरपुर, जिल्हा
सोलापुर हे त्यांची मुलगी ऐश्वर्या हिचे लग्न कोल्हापुर येथील क्रषिकेश पाटील यांचेबरोबर वाखरी, ता. पंढरपुर यांचेसोबत असल्याने ते दि. 22/02/2021 रोजी सकाळी 10/00 वा चे सुमारास रहाते घरास कुलुप लावुन वाखरी, ता. पंढरपुर येथे त्यांचे कुटुंबासह गेले होते. तेथे फिर्यादीचे मुलीचे लग्न समारंभाचा कार्यक्रम झालेनंतर सायंकाळी 05/00 वा चे सुमारास ते त्यांचे राहते घरी परत आले असता फिर्यादीची पत्नी संगिता यांनी घराचे
कुलुप उघडुन घरात गेली असता घराचा मागील दरवाजा उघडा दिसला तसेच बेडरुममधील लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, त्यानंतर फिर्यादीचे पत्नी संगिता यांनी लाकडी कपाटात ठेवलेले
2,14,500/- रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने तपासुन पाहीले असता ते मिळुन आले नाहीत म्हणुन त्यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाणेस फिर्याद दिली असुन सदर बाबत पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुरनं 134/2021 भा.द.वि. 454,380 प्रमाणे दि. 05/03/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ठिकाणी श्री. अरुण पवार, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे तसेच गुन्हे प्रकटीकरण
शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी सदर ठिकाण पाहिले असता सदर घराचे मागील दरवाजाने घरात प्रवेश केला
असल्याचे दिसल्याने सदर ठिकाणची चोरी ही घरात येणारा जाणारा इसमाने केली असल्याचे प्राथमिक अंदाज लावला.सदर अज्ञात व्यक्ती ही घरातील असल्याचे संशया वरुन सदर गुन्हयाचे फिर्यादी व त्यांचे घरातील
व्यक्तींकडे त्यांचे घशत काम करण्याकरीता येणारे व त्यांचे घरात येणारे जाणारे इसमां बाबत विचारपूस केली
असता त्यांनी त्यांची नावे सांगितल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर इसमांच्या
हालचालीवर नजर ठेवण्यास सुरवात केली असता त्यातील फिर्यादीच्या घरी कामाकरीता येणा-या एका
महिलेवर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी कर्मचारी यांना संशय आल्याने सदर महिलेवर तांत्रिक दृष्टया व
त्याचेवर गोपणीय लक्ष ठेवण्यात आले. सदर महिलेची हालचाल संशयास्पद दिसून आल्याने संशईत महिलेस
ताब्यात घेवुन महिलेजवळ गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली. नंतर तीला पोलीस ठाणेस आणून अधिक
विश्वासात घेवून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता तिने सदर गुन्हा केल्याचे सांगितल्याने तिचे कडून सदर गुन्हयातील संपर्ण माल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक मा. तेजस्वी सातपुते मॅडम अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुल
झेंडे सो मा. श्री. विक्रम कदम सो. उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली
श्री. अरुण पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई राजेंद्र गाडेकर,पोहेका सुरज हेंबाडे, पोहेका राजेश गोसावी, पोहेकाँ इरफान मुलाणी, पोहेकाँ/
बिपीनचंद्र ढेरे, पोना इरफान शेख, पोना शोएब पठाण, पोना महेश पवार, पोकाँ
सिध्दनाथ मोरे, पोकाँ सुजित जाधव, पोकां/संजय गुटाळ, पोकाँ/ समाधान माने, पोकाँ
सुनिल बनसोडे, मपोकाँ निता डोकडे यांनी केली असून सदर गुन्हयाचा तपास पोहेकाँ सुरज हेंबाडे हे
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.






