प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत होणारा गृह प्रकल्प सुरक्षित ठिकाणी करण्यात यावा शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेची मागणी
प्रतिनिधी रफिक आत्तार
पंढरपूर शहरातील नगरपालीका व प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत चार ते पाच हजार घर प्रकल्प बांधणे चालू आहे त्यातील पहिला टप्पयातील 892घरांचे काम चालू आहे, सदर प्रकल्प ज्या जागेत म्हणजे जुना कचरा डेपोच्या जागेवर हा प्रकल्प उभारणे चालू आहे ती जागा पूर प्रवणक्षेतात येत असून म्हणजे पंढरपूर शहरातील नागरिकांना आगीतून उठून फपूट्यात पडल्या सारखी अवस्था होणार आहे.
कारण पंढरपूर शहरात ज्या ज्या वेळी पूर आलेला आहे, त्या त्या गोपाळपूर नाल्यातून त्या कच-या डेपूचा भाग पुर्ण हा पाण्याखाली गेले आहे. आणि पुन्हा त्याच जागेवर बेघर कुटूंबियांना घर बांधून देण्याचा काय उपयोग आहे हा प्रश्न निर्माण होतोय,तरी कचरा डेपो येथे होणारा घर प्रकल्प बंद करून सुरक्षित शासकीय जागेवर हलवण्यात यावा,केंद्र व राज्य शासनाने 2.50लाख रूपये अनुदान दिले जाणार आहे.व उर्वरित रक्कम बँकामार्फत नागरिकांना कर्ज काढुन देण्यात येणार आहे, त्या पंढरपूर शहरातील नागरिकांची फसवणूक होवू नये,व शासनाचा येणारा करोडो निधी चुकीच्या ठिकाणी वापरला जावू नये,सदर जर प्रकल्प दुस-या सुरक्षित शासकीय जागेवर न हलविण्यास त्याच ठिकाणी पुर्ण केल्यास त्या न प्रकल्पाविरोधात झोपडपट्टीवासीयांना वैयक्तिक जागेवर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल देण्याची मागणी केली आहे व शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने बेमुदत अमर उपोषण केले जाईल, तसेच सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री मा.दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर बेमुदत अमरण उपोषण केले जाईल, किंवा पंढरपूर प्रांतकार्यालयासमोर बेमुदत अमर उपोषण केले जाईल.असे निवेदन पंढरपूर प्रांतअधिकारी सचिन ढोले साहेब यांना निवेदन देताना
यावेळी निवेदन देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदिप मांडवे, आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे सागर कदम,देवराज युवा मंचाचे अध्यक्ष शहाजी शिंदे,ओ.बी.सी.सेलचे मधुकर फलटनकर,राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष राकेश सांळुखे, विजय मोरे,सागर कावरे,औकार चव्हाण,किरण शिंदे,अजय गुंड,विष्णू देवमारे, यश घोडके, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.






