Surgana

शहरातील व खेड्यातील रस्ते हे एकजुटीची साक्ष देत आहेत. सुरगाणा शहर व तालुका वासियांची एकमेकांना मिळते साथ !

शहरातील व खेड्यातील रस्ते हे एकजुटीची साक्ष देत आहेत.
सुरगाणा शहर व तालुका वासियांची एकमेकांना मिळते साथ !

विजय कानडे

सलाम सुरगाणा तालुका वासियांना.
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्य़ातील उत्तरेला असलेला अतिदुर्गम भाग म्हणून समजला जाणारा शासना कडून हि दुर्लक्षित असलेला आदिवासी बहुल तालुका पण याच तालुक्याने शासनाने दिलेल्या हाकेला ओ देत शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. ‘सुरगाणा’आदिवासी बांधवांचे रोटी,कपडा, मकान या त्रिसूत्री करीता दैनंदिन जीवनातील गरजा भागविणे करीता नेहमीच वर्दळ असलेले ठिकाण मात्र कोरोना’ चा सामना करण्यासाठी याच रस्त्यावर निरव शांतता आढळून येत आहे तर निर्मनुष्य झालेले शहरातील व खेड्यातील रस्ते हे एकजुटीची साक्ष देत आहेत.
सुरगाणा शहर व तालुका वासियांची एकमेकांना मिळते साथ !
सर्व मिळून करु कोरोना’ वर मात !

मा.पंतप्रधान यांच्या हाकेला ओ देऊन ‘कोरोना’या महामारीला पिटाळून लावण्या करीता सुरगाणा शहरवासिय व खेड्यातील नागरिकांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सन्मानिय नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपंचायतीचे कर्मचारी,अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी,अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी, पत्रकार बांधव, व्यापारी बांधव, तालुक्यातील आजी, माजी,लोकप्रतिनिधी,
जि.प.सदस्य,पंचायत समिती सभापती, उपसभापती,सदस्य, पोलिस पाटील,शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी बांधव, सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सर्व सामान्य नागरिकांनी बोरगाव, अलंगूण, बा-हे,हतगड,चिकाडी, हातरुंडी,पळसन, आमदा,भवाडा, ऊंबरठाण,पांगारणे,खुंटविहिर,काठीपाडा, बर्डीपाडा,रघतविहिर, अतिदुर्गम भागातील पिंपळसोंड- कुंदा रिसोर्ट,खिर्डी,भाटी, खोकरविहीर यासह
संपूर्ण तालुक्यात शंभर टक्के ‘जनता कर्फ्यू यशस्वी केला आहे.यापुढेही भविष्यात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

शहरातील एरव्ही गर्दी आढळते मात्र जनता कर्फ्यू मुळे रस्त्यांवर पसरलेला शुकशुकाट.

ठिकाणे- होळी चौक, बसस्टॉप,मेनरोड,झेंडा चौक,वणी रस्ता,तेली गल्ली,आझाद गल्ली, तेल्ली गल्ली या रस्त्यावर स्मशान शांतता पसरली आहे.
धन्य ! ते सुरगाणा तालुका वासिय बांधव.
आपले गाव,तालुका, जिल्हा,राज्य,देश,जग कोरोना मुक्त करु या.!
माझा देश ! माझी सुरक्षा !!.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button