Jalgaon

जिल्ह्यात अंत्यविधीसाठी वीस जणांनाच परवानगी जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

जिल्ह्यात अंत्यविधीसाठी वीस जणांनाच परवानगी जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

रजनीकांत पाटील

जळगाव :- “कोरोना’ रुग्णांची संख्या वाढत असली, तरी जिल्ह्यात अजूनही अंत्यविधीसाठी गर्दी होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे या संसर्गाला आळा बसण्यासाठी अंत्यविधीसाठी गर्दी न करता वीसपेक्षा अधिक नागरिकांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस “कोरोना’ रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे क्षेत्रीय स्तरावर माहिती घेतली असता, जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे “कोरोना’चा संसर्ग वाढतच असल्याचे निदर्शनास येत आहे. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल, अशा सूचना असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी वीसपेक्षा जास्त जणांनी उपस्थित राहू नये, तसेच मृतदेह हाताळताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button