सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण भागात हातावर पोट असलेल्या आदिवासी गोरगरिबांना श्री रमेश थोरात व योग विद्या गुरुकुल त्र्यंबकेश्वर
यांच्या वतीने यांचा मदतीचा हात….
विजय कानडे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले. सुरगाण्या तालुक्यांतील असे अनेक मोलमजुरी करून पोट भरणारे कामगार आहेत, ज्यांना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था नव्हती.हातावर पोट असलेल्या कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम करणारे कामगार शेजारील तालुक्यात उद्दर निर्वाह करण्यासाठी विशेषत: दिंडोरी,निफाड,नाशिक,या तालुक्यामध्ये द्राक्षबागेचे कामाला हे कुटुंब कामाला होते लॉकडाऊन झाले असे कळताच कसे बसे लोक स्वत:चा जीव मुठीत घेऊन घरी परतले आज गावात कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही आशा कुटुंबावर मोठं संकट आल आहे यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणुन 300 हून अधिक गरजूंना किराणा सामान कृतज्ञता म्हणुन मोफत वाटप करण्यात आले.
सुरगाणा .भदर .चुली.नवापूर .करूंझिरा सातबाभळगरजू लोकांची भागांतून एक यादी बनवण्यात आली असून श्री श्री रमेश थोरात नगरसेवक सुरगाणा
योग विद्या गुरुकुल त्रंबकेश्वर यांच्या वतीने त्यांना घरपोच हे शिधा सामान दिले जात आहे.
या वेळी युवा नेते श्री. दिपक खोत श्रीराम भाऊ थोरात श्री दिनेश पवार श्री प्रभाकर चौधरी श्री विनोद आहेर श्री प्रसाद बागुल गणेश श्री योगेश चव्हाण आदी उपस्थित होते






