फैजपूर

अपमानजनक बॅनर लावल्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार….

अपमानजनक बॅनर लावल्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार….

अपमानजनक बॅनर लावल्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार....

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
विद्यमान भाजपा आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांचे मानहानी कारक बॅनर संपूर्ण रावेर विधानसभा मतदार संघात लावले गेल्याने भाजप व भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा तीव्र संताप झाला व यावल व फैजपूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली
     घटना आज दिनांक 10 रोजी सकाळी अकरा वाजताची आहे
     यावल दिनांक 10 ता. प्र.  भारतीय जनता पार्टीचे आमदार हरिभाऊ जावळे माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांचे छायाचित्रासह मी कोण प्रश्न चिन्हाचा वापर करून रावेर यावल मतदार संघातील सर्व बंधू-भगिनींनो सप्रेम नमस्कार रावेर यावल विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार, माजी आमदार हे आहेत, रावेर यावल शेतकरी बांधवांची भूमी आहे या भूमीवर सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना गेल्या दहा वर्षांमध्ये कधी मदतीची साथ म्हणून आत हातभार लावला आहे का ? दुष्काळी परिस्थिती तुमच्या मदतीला धावून आले का ? नागरिकांना भेटून नागरिकांच्या गरजांची कधी विचारपूस केली आहे का? इत्यादी बदनामीकारक मजकुराचे बॅनर यावल रावेर मतदार संघात कोणीतरी ठिक ठिकाणी लावून बदनामी, मानहानी केल्याने संपूर्ण मतदार संघातील भारतीय जनता पार्टी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी संयुक्तरीत्या तीव्र संताप व भावना व्यक्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणे संदर्भात यावल व फैजपूर पोलिसात लेखी तक्रार दिली आहे.                                       दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की कोणीतरी अज्ञात इसमाने माननीय नामदार हरिभाऊ जावळे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे बॅनर मध्ये फोटो टाकून मानहानीकारक मजकूर टाकलेला आहे सदर बॅनर हे यावल येथे विविध ठिकाणी व इतर ठिकाणी लागलेले असून रावेर यावल मतदारसंघात हेतुपूर्वक राजकीय व सामाजिक बदनामी करण्याच्या सुड बुद्धिने सदर बॅनरबाजी करण्यात आली आहे या ठिकाणी बॅनर लावण्यात आले ते होर्डिंग पटेल आर्ट्स इतरांच्या मालकीचे असून संबंधितांच्या परवानगी शिवाय हे बॅनर लावले गेले आहेत हे बॅनर लावणार यांचा आपण शोध घेऊन गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कारवाई करावी ही विनंती यावल शहराध्यक्ष हेमराज ऊर्फ बाळू फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, राकेश फेगडे, वेंकटेश बारी, उमेश फेगडे, गोपाळ महाजन, किशोर कुलकर्णी, घारू,  लहू पाटील, गोपालसिंह पाटील, दीपक पाटील, किशोर फालक अतुल भालेराव,ईत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या स्वाक्षरीसह यावल पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. सुनिता कोळपकर यांना निवेदन देऊन बदनामी करणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button