Mumbai

?️ बॉलीवूड ब्रेकिंग..रणबीर – करीनाचा आतेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीचा छापा

?️ बॉलीवूड ब्रेकिंग..रणबीर – करीनाचा आतेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीचा छापा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि करीना कपूरचा आतेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. तसेच चौकशीसाठी त्याला समन्सही पाठवले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरमान जैनचे नाव समोर आले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरमान जैनच्या ऑल्टामाउंट रोड येथील घरी छापेमारी केली आहे.
जेव्हा ईडी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी करत होते, तेव्हा या प्रकरणात अरमान जैनचेही नाव समोर आले होते.
अरमान जैन हा प्रताप सरनाईक यांचे मित्र विहांगचा मित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या तपासात ईडीला अरमान आणि विहांग यांच्यात काहीतरी आक्षेपार्ह बातचीतविषयी समजलं होतं. यानंतर ईडीने अरमान जैनच्या घरी छापा टाकला.
नोव्हेंबर, २०२० मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी सरनाईक यांच्या ठाणे येथील घरी छापा टाकला होता. यानंतर विहंगला ईडीच्या ऑफिसमध्ये बोलावण्यात आले होते. विहंगला टॉप्स ग्रुप्स आणि सरनाईक यांच्या जवळच्या व्यक्तींबाबत पैशांच्या देवाणघेवाण संदर्भात चौकशी केली होती.

कोण आहे अरमान जैन?

अरमान जैन रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांची बहिण रीमा जैन यांचा मुलगा आहे. त्याने २०१४ मध्ये ‘लेकर हम दीवाना दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्याने स्टुडेंट ऑफ द इयर, एक मैं और एक तू आणि माय नेम इज खान यासारख्या चित्रपटांमध्ये असिस्टंट म्हणून काम केलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button