प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य ही संघटना घेणार पत्रकारांच्या समस्यांची दखल – औसा तालुका कार्याध्यक्ष बालाजी उबाळे
लक्ष्मण कांबळे
औसा-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य ही संघटना घेणार पत्रकारांच्या समस्यांची दखल घेणार असल्याचे
औसा तालुका कार्याध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे औसा प्रतिनिधी बालाजी दे उबाळे यानी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील सर्व संपादक व पत्रकार बांधवांना आवाहन करण्यात येते की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात काही पत्रकारांवर लाठीमार करण्यात आला,काही पत्रकारांना पोलिसांकडून मानहानी ची वागणूक देण्यात येत असल्याने आणि औसा पोलीस निरीक्षक यांची पत्रकार यांच्या विरुद्ध सतत हिंनतेची भावना वारंवार निदर्शनास येते, तर अनेक पत्रकारांना महाराष्ट्रात नोटीस बजावण्यात आली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डाॅक्टर,पोलिस, नर्स यांच्यासारखेच आपला जीव धोक्यात घालून पत्रकार बांधव कोरोनाची बातमी संकलन करणेसाठी सातत्याने बाहेर फिरत आहेत पण शासनाने पत्रकारांना अद्यापही कोणतीच मदत जाहीर केलेली नाही.किंवा विमा संरक्षण नाही कोणतेही पॅकेज नाही! पत्रकारांनी जीव धोक्यात घालायचा आणि समाजापर्यंत बातमी पोहोचवायची,राजकीय मंडळीची प्रसिद्धी करायची,रात्रंदिवस देशवासीयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पत्रकारचं का शासकीय योजना किंवा लाभापासून वंचित राहीला ? पत्रकारांना कोणत्याही प्रकारचा शासकीय पगार मिळत नाही, मानधन मिळत नाही,सध्या जाहिराती बंद आहेत मग पत्रकारांनी जगायचं कसं? त्यांना कुटुंब नाही काय?संसार नाही काय? हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत.
ग्रामीण भागात तर पत्रकारांच्या चुली बंद होण्याची वेळ आलेली आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ मात्र यावेळी सर्वच स्तरावरून दूर्लक्षित राहीला आहे,याला जबाबदार कोण?
सध्या पत्रकारांची आठवण कोणत्याही राजकीय नेत्यांना येत नाही,आलीच तर ती फक्त बातमी प्रसिद्ध करण्या इतकीच येते, सध्या पत्रकार बातमी देतात बातमी प्रसिद्ध होते बातमी सर्वांपर्यत पोहचतेय आणि पत्रकार मात्र उद्याच्या आशेवर आज उपाशी मरत-मरत जगतोय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व संपादक व पत्रकार बांधवांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे आवाहन आहे की, लाॅकडाऊनच्या काळात ज्या संपादक किंवा पत्रकारांना ज्या-ज्या समस्यांना सामोरे जावे लागले ती समस्या 10 ते 15 ओळीत लिहून पाठवा किंवा 30 ते 60 सेकंदाचा विडीओ करून प्रेस व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी. टी. यांच्या 9270559092 या व्हाट्सअॅपवर दि. 14 / एप्रिल/ 2020 पर्यंत पाठवावे पत्रकारांच्या प्रत्येक समस्येची संघटना दखल घेऊन त्यावर उपााययोजना करण्यात येेेणार असल्याचे प्रेस व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी टी यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळविले असल्याची माहिती या संघटनेचे औसा तालुका कार्याध्यक्ष बालाजी दे उबाळे यांनी कळविले आहे.






