विधवा महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त मानवसेवा संस्थेच्या वतीने कपडे वाटप
सुनिल नजन
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मानवसेवा संस्था मोहोज यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधवा, परित्यक्ता, आर्थिक द्रुष्ट्या कमकुवत घटकातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. संपूर्ण तालुक्यातील महिला यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ संध्याताई आठरे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र संत बद्रीनाथ महाराज तनपुरे व त्यांच्या सुसंस्कृत पत्नी सत्यभामा तनपुरे,न्यु इंग्लिश स्कुल मोहोज च्या मुख्याध्यापिका संगिताताई भापसे,शरदचंद्रजी पवार कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका शेळके,ह.भ.प. सारिकाताई देवकाते,या उपस्थित होत्या. प्रारंभी मानवविकास संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुनिल मतकर सर यांनी प्रास्ताविक केले. स्मरणिकेचे प्रकाशन करून सर्व महिला नेत्यांनी महिला दिन का साजरा केला जातो या विषयी मार्गदर्शन केले. महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनिता घुले,पार्वती शिंदे, अंजली ओहोळ,मिना मिसाळ यांनी विषेश सहकार्य केले. उ
पेक्षित महिलांना साड्या मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडुन वाहत होता. सुत्रसंचालन पत्रकार सुनिल नजन,भगवान राऊत यांनी तर आभार वजिर शेख यांनी मानले .






