Maharashtra

२५व्या अर्जुना सैनिकीय प्रशिक्षण शिबिराच दिमाखात उदघाटन

२५व्या अर्जुना सैनिकीय प्रशिक्षण शिबिराच दिमाखात उदघाटन

प्रतिनिधी लियाकत शाह
अर्जुना बहुउद्देशीय संस्थेच्या आयोजित २५व्या अर्जुना सैनिकीय प्रशिक्षण शिबिराच दिमाखात उदघाटन संपन्न प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून झाले, सन १९९६ ते २०१९ गत २३ वर्षात २५ कॅम्पच्या माध्यमातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिबिराचा लाभ घेतला आहे, शालेय जीवनात व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनें विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, साहस, नेतृत्व, निर्णयक्षमता, राष्ट्रीयएकात्मता, देशभक्ती, देशप्रेम या गुणांचा विकास व वृद्धी व्हावी हा या शिबिराच्या द्वारे अर्जुना संस्थेचा प्रमुख उद्देश. त्याच अनुषंगाने यंदाच्या कॅम्प चे हे २५ वे वर्ष असून उदघाटन प्रसंगी मा आमदार श्री संजय सावकारे यांच्या लाभलेल्या उपस्थितीत आजच्या काळात विद्यार्थी टेलिव्हिजन, मोबाईल-पबजी सारख्या जीवघेण्या खेळाच्या आहारी गेले असल्याने विद्यार्थ्यांचा जीवनात अश्या प्रकारच्या कॅम्पचें महत्व काय व कसे आहे याबाबद आपल्या मार्गदर्शनीय भाषणात योगासन, पिटी, परेड, एअररायफल शुटींग, हॉर्सरायडिंग, ट्रेकिंग, ऱ्यापलिंग, स्पोर्ट्स, प्रथमोपचार, आपत्तीव्यवस्थापनातील-शोध व बचाव कार्य ई बाबतचे महत्व सांगितले यांची होती उपस्थिती मा.आमदार श्री संजयभाऊ सावकारे, नपा नगरअध्यक्ष श्री, रमण भोळे, जिल्‍हा संघटन सरचिटणीस सुनील नेवे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नारावीरसिंह रावळ, अर्जुना संस्था अध्यक्ष नंदकिशोर पंड्या, कॅम्प कमांडर योगिनी श्रीवास्तव, सामाजिक कार्यकर्ते गिरीश महाजन, तसेच कॅम्पचें प्रशिक्षक नाहटा महाविद्यालयाचे NCC चे विद्यार्थीसह आकाश चौधरी,चेतन बोरणारें,अक्षय राजनकर, फरीद बागवान, मयूर गोलांडे, स्कायलॅब डिसुझा, आदी तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन अपतीव्यवस्थान मास्टरट्रेनर सतिष कांबळे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button