जळगांव जिल्यातील उपहारगृहे फक्त पार्सल सेवाच देऊ शकतात… मा जिल्हाधिकारीजळगाव रजनीकांत पाटीलराज्य शासनाने निर्गमित केलेल्या नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्यातील
हॉटेल, उपहारगृहे यांना पार्सल द्वारे अन्नपदार्थ विक्री करण्याची परवानगी देण्यात
आलेली आहे. हॉटेल, उपहारगृहे सुरु असली तरीही त्यातुन फक्त पार्सलद्वारे
अन्नपदार्थ देण्याची मुभा आहे, त्याठिकाणी थांबुन जेवण करण्याची परवानगी नाही.
प्रशासनामार्फत याची वेळोवेळी तपासणी ही करण्यात येत आहे. जिल्ह्यातील
सर्व नागरिक, हॉटेल/उपहारगृहे चालक/मालक यांनी नियमावलीचे पालन करावे.
नियमावली मोडणाऱ्यांविरुध्द तसेच अफवा पसरविणाऱ्यांविरुध्द साथ रोग प्रतिबंधक
अधिनियमांन्वये कारवाई करण्यात येईल.असे मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे.






