Yawal

यावल ग्रामीण रुग्णालयास सुद्धा चार कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका ? रुग्णांना मोठी अडचण येणार.

यावल ग्रामीण रुग्णालयास सुद्धा चार कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका ?
रुग्णांना मोठी अडचण येणार.

रजनीकांत पाटील

यावल प्रतिनिधी >> यावल ग्रामीण रुग्णालयातील एक कर्मचारी आधीच पॉझिटिव्ह आढळून आल्याने जळगाव येथील कोविड सेंटरला त्याला औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे यावल ग्रामीण रुग्णालयातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणु ची बाधा झाली आहे. किंवा नाही याबाबतची आरोग्य तपासणी व चौकशी करणेकामी त्यांना कोरोना केअर सेंटरला पुढील औषधोपचारासाठी पाठविण्यात आल्याचे संपूर्ण यावल परिसरात दबक्या आवाजात बोलले जात असले तरी याबाबत ग्रामीण रुग्णालयातील किंवा जिल्हा आरोग्य विभागाकडून माहिती घेतली असता अधिकृत माहिती मिळालेली नाही.

परंतु यावल ग्रामीण रुग्णालयातील वरील 4 कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आलेले असल्याने यावल ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या अनेक रुग्णांनी आपले आरोग्य हिता बाबत दक्षता बाळगून फारच महत्वाचे औषध उपचार घ्यायचे असतील तरच ग्रामीण रुग्णालयात यायला पाहिजे असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button