मुस्लिम बांधवाच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन
देगांव जि.प. शाळेचा अनोखा उपक्रम
शिवप्रेमींकडून शाळा १००% डिजिटल करण्यासाठी दोन टिव्ही संच भेट
प्रतिनिधी
रफिक अत्तार
पंढरपूर १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देगांव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी शाळेच्यावतीने गावातील मुस्लिम बांधव आशपान जहांगीर शेख यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.ज्याप्रमाणे शिवरायांनी जात पात मानली नाही.कोणत्याही धर्माची दरी शिल्लक ठेवली नाही.सर्वांना समानतेची वागणूक देऊन स्त्रियांचा सन्मान करण्याचे संस्कार दिले.तीच शिवरायांची शिकवण आपल्या अंगात रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश लेंडवे यांनी बोलताना केले.यावेळी जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी डिव्हिपी शुगरचे संचालक संतोष अशोक कांबळे यांच्यावतीने तसेच महमंद हनिफ इस्माईल शेख यांचे स्मरणार्थ आशपान जहांगीर शेख यांच्याकडून टीव्ही संच शाळेस भेट देण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देगावाचे सरपंच संजय घाडगे, उपसरपंच धर्मेंद्र(आबा) घाडगे,ग्रामपंचायत सदस्य रणजीत गोसावी,सदस्य सुभाष घाडगे,सदस्य समाधान घाडगे,सदस्य समाधान भोई,तंटामुक्त अध्यक्ष विलास रणदिवे, माजी उपसरपंच सुरेश तात्या घाडगे,माजी तंटामुक्त अध्यक्ष काका पाटील,भीमराव घाडगे,शिवप्रतिष्ठान समूहाचे सदस्य,गावकरी,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






