Jalgaon

मोरपंख ” संस्थेतर्फे 24 जानेवारीला जळगावात समाजसेवकांचा गौरव व उदघाटन

मोरपंख ” संस्थेतर्फे 24 जानेवारीला जळगावात समाजसेवकांचा गौरव व उदघाटन

सलीम पिंजारी जळगांव

जळगाव : रावेर तालुक्यातील मस्कावद येथील महाराष्ट्र शासन नोंदणीकृत ” मोरपंख बहुउद्देशीय संस्थे ” तर्फे येत्या 24 जानेवारी , रविवार रोजी सकाळी 10 वाजता एक समाजाभिमुख उपक्रम व कौतुक सोहळा जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
समाजात अनेक जण सत्कर्म आणि सामाजिक बांधिलकी जपून निस्वार्थपणे कार्य करीत असतात. कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न ठेवता केवळ ‘ माणुसकी धर्म ‘ व सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेऊन ते कार्य करीत असतात , त्यांची कुठे न कुठे दखल ही घेतलीच जात असते , हे ही तितकेच खरे आहे.
गेल्या 8 महिन्यांपासून कोरोना या भयावह विषाणूंचा सर्वच जण मुकाबला करीत आले आहेत..त्याचप्रमाणे समाजात वावरताना गोरगरीब , उपेक्षित आणि गरजू लोकांच्या उत्थानासाठी काही जण समाजसेवा करीत असतात , समाजाचे ते ‘ दीपस्तंभ ‘ च आहेत. अशाच काही प्रेरणादायी , जेष्ठ समाजसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे उदघाटनही याप्रसंगी होईल.
या कौतुक सोहळ्यास माजी महसूल व कृषिमंत्री मा. एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ.प्रमोद महाजन , नाशिक हे असणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजुमामा भोळे , पिंपळे सौदागर लेवा भ्रातृ मंडळाचे कार्याध्यक्ष कृष्णाजी खडसे , पिंपळे सौदागर लेवा भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे , उपमहापौर सुनील खडके , समाजसेविका सुचित्रा महाजन , सामाजिक कार्यकर्त्या निशा अत्तरदे डोंबिवली यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात डॉ.प्रमोद महाजन , कृष्णाजी खडसे , पुरुषोत्तम पिंपळे ,जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार व कलावंत तुषार वाघुळदे , अमोल महाजन ( नाशिक ),पंकज नाले , मंगला पाटील ( भुसावळ ) , दीपक दाभाडे , सुचित्रा महाजन , निशा अत्तरदे , डॉ.जयंती चौधरी ,ज्योती राणे यांचा शाल, सन्मानपत्र आणि मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. उपस्थितांना विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यक्रम जळगावच्या रायसोनीनगर येथील गट नं. 460 बी , प्लॉट नं. 3 श्री भरीत सेंटरच्या हॉलमध्ये होईल . नागरिकांनी व समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन ‘ मोरपंख ‘ या नूतन संस्थेच्या अध्यक्षा नयना टोके , उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील , सचिव गणेश टोके आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button