Pandharpur

महिला बचत गटाचा विषय आता राज ठाकरे यांच्या दरबारात राज्याचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी मांडले अनेक महत्वपूर्ण विषय

महिला बचत गटाचा विषय आता राज ठाकरे यांच्या दरबारात
राज्याचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी मांडले अनेक महत्वपूर्ण विषय

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहराचे व महाराष्ट्र राज्याचे मनसे सरचिटणीस तथा सहकार सेना प्रदेशाध्यक्ष व शेडो कॅबिनेट सहकारमंत्री दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपुरातील झोपडपट्टीवासी यामधील गोरगरीब महिलांची तातडीने दखल घेत थेट पाऊल उचलले मुंबईकडे कृष्णकुंज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांची महिला बचत गटाच्या भगिनींना मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत निवेदन देऊन चर्चा केली.यावेळी साहेबानी या सर्व प्रश्नावर महिला भगिनींना मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले महाराष्ट्रातील बचत गटाचे कर्ज घेतलेल्या भगिनींनी कसलीही काळजी करू नये, चिंताग्रस्त होऊ नये, कुठल्याही परिस्तिथीत टोकाचे पाऊल उचलू नये,सर्व माता भगिनींच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी राहील तसेच शेतकऱ्यांना खताचा जो कृत्रिम तुटवडा केला जात आहे, तसेच युरिया टंचाई दाखवली जात आहे,, युरिया देताना खत दुकानदार दुसरी खते शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत या सर्व विषयावर चर्चा झाली.

यावेळी मनसे सरचिटणीस तथा सहकार सेना प्रदेश अध्यक्ष व शेडॉ केबिनेट सहकार मंत्री दिलिप बापू धोत्रे,शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button