महिला बचत गटाच्या सर कडून झोपडपट्टीमधील गोरगरीब महिलांना प्रेशर
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरातील संतपेठ विभागामध्ये महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्सचे हजारो रुपयांची कर्जे दिली आहेत. दरम्यान लाॅकडाऊनने महिला बचत गटांचे अनेक छोटे मोठे उद्योग व व्यवसाय ठप्प झाले आहेत.अशा परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने मायक्रो फायनान्सने दिलेली अल्पमुदतीची कर्जे माफ करावीत, अशी अशी मागणी महिलांकडून होत आहे यासंदर्भात जिल्ह्याच्या शहर व ग्रामीण भागात प्रत्येक गावात महिला बचत गट आहेत. गटाच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय करुन महिला आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. महिला बचत गटांनी उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध बँका एस के एस फायनान्स व ग्रामीण कुटा फायनान्स बंधन बँक आणि खासगी मायक्रो फायनान्सकडून हजारो रुपयांची कर्जे घेतली आहेत.दरम्यान मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन आहे. या काळात सर्वच उद्योग व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे महिला बचत गटाचेही उत्पादन ही थांबले आहे.
उत्पादन थांबल्याने सर्रास महिला बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहेत.अशातच आता बचत गटांना दिलेल्या कर्जासाठी मायक्रो फायनान्सच्या महिला बचत गटाचे सरांनी वसुलीसाठी तगादा लावला आहे. व मायक्रो फायनान्स व तेथील अधिकारी व कर्मचारी महिलांना पैसे भरा नाहीतर रकमेचा व्याजा प्रमाणे दंड करण्यात येईल असे तगादा लावत आहेत लाॅकडाऊन काळात उद्योग आणि व्यवसायिकांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु यामध्ये महिला बचत गटांना कोणतीही आर्थिक मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील अनेक महिला बचत गट सध्या आर्थिक अडचणीत आले आहेत.महिला बचत गटांचे मायक्रो फायनान्सचे कर्जे माफ करावे असे महिला बघून कडून मागणी व्यक्त होत आहे.






