साहित्य शिवारच्या डिजिटल वेब कविसंमेलन व चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद नामवंत साहित्यिक व कलावंतांची विशेष उपस्थिती
प्रतिनिधी.प्रशांत नेटके
साहित्य शिवार साहित्य समूहाच्या वतीने ऑनलाईन फेसबुक डिजिटल वेब कविसंमेलन व साहित्यिक चर्चासत्र या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत कार्यक्रमाला विविध नामवंत साहित्यिक व कलावंतांची विशेष उपस्थिती लाभली आहे. मराठी भाषा संवर्धन व दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध साहित्य समूह “साहित्य शिवार ” हे साहित्यिक,कलावंत व पत्रकार यांच्यासाठीचे मुक्त विचारपीठ असून यामाध्यमातून वर्षभर विविध साहित्यिक कार्यक्रम,नवोदितांसाठी लेखन कार्यशाळा व चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येते. २ जून २०२० रोजी सुरू झालेल्या या डिजिटल वेब कविसंमेलनाचे उदघाटन वऱ्हाडी कवी विशाल मोहोड यांचे हस्ते करण्यात आले होते.तदनंतर विविध साहित्यिक व नामवंत कलावंतांनी “साहित्य शिवार” फेसबुक पेजवर आपली उपस्थिती दर्शवत साहित्यिक रसिकांची मने जिंकून घेतली.यामध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक अरुणजी देशपांडे,विनोद कुमरे,आकांतकार बाबाराव मडावी,सखाराम डाखोरे,आकाशवाणी निवेदक कैलास नाईक, सुरेश काळे,संत साहित्याचे अभ्यासक व पत्रकार श्री सुनील इंदूवामन ठाकरे,अजय देशपांडे, विजय जाधव,पुष्कर उऱ्हेकर, भीमराव सोनवणे,प्रकाश क्षीरसागर,युवा व्याख्याते शंकर गोपाळे,सुनील महाराज लांजुळकर तसेचं साहित्यिका वर्षा सगदेव,निर्मल काळबांडे सुप्रसिद्ध अभिनेते व नाट्यकलावंत प्रशांत शेटे, बाबाराव मडावी, श्रीकांत दिक्षित,बाल कलाकार महेश तळेकर, राजेंद्र गोसावी,विजयकुमार पाटील,अशोक आगरकर,किशोर बुजाडे आदि साहित्यिकांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला साहित्यिक रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रा. डॉ. विनोद कुमरे,प्रा. सखाराम डाखोरे,अभिनेते प्रशांत शेटे, कादंबरीकार बाबाराव मडावी,साहित्यिक व पत्रकार श्री सुनील इंदूवामन ठाकरे,आकाशवाणी पुणे निवेदक कैलास नाईक इत्यादी मान्यवरांची उपस्थिती व त्यांनी सादर केलेले कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहित्य शिवार साहित्य समूहाचे अध्यक्ष व मुख्य समन्वयक श्री विशाल कन्हेरकर,वैभव कन्हेरकर, तसेचं श्री गजानन काकडे,विशाल मोहोड,वंदना भोरे,मनोहर बडवे,प्रशांत गोरे,श्याम सावरकर,प्रशांत नेटके ( लातूरकर), पल्लवी चिंचोळकर,शीतल राऊत,गौरव कांडलकर आणि संपूर्ण टीमने अथक परिश्रम केले.






