Nagpur

आदिवासी पारधी समाज संघटना व्दारे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

आदिवासी पारधी समाज संघटना व्दारे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

आदिवासी पारधी समाज संघटना व्दारे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

 
नागपूर प्रतिनिधी अनिल पवार 
चांपा  : – श्री दादाजी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ , यवतमाळ व आदिवासी पारधी जनसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुर येथे विदर्भ हिन्दी साहित्य संमेलनच्या सभागृहात आदिवासी पारधी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात साजरा करण्यात आला.आदिवासी पारधी  समाजाने शिक्षण क्षेत्र, समाजकारण, राजकारणात सक्रीय सहभाग घेतला तरच समाजाच्या विविध समस्या निकाली काढुन समाज प्रगती पथाकडे वाटचाल करू शकतो.यावेळी पदवीधर विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा संबंधित मार्गदर्शन करतेवेळी  नवीन पिढीला उच्च शिक्षित करून समाजाचे शिस्तबद्ध संघटन निर्माण करून आधुनिक संघर्ष समाज बांधवांनी एकत्र येऊन करावाच लागेल. असे भावनिक मार्गदर्शन  तहसिलदार प्रताप वाघमारे यांनी केले.

आदिवासी पारधी समाज संघटना व्दारे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
आदिवासी पारधी जनसेवा संस्था व श्री दादाजी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ मुकिंदपूरव्दारे रविवार दि.१५ सप्टेंबर २०१९ ला दुपारी ११ वाजता नागपुर येथील  विदर्भ हिन्दी साहित्य संमेलन सिताबर्डी  येथे श्री मतिनजी भोसले प्रदेशाध्यक्ष श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना व संस्थापक प्रश्नचिन्ह आदिवासी फासेपारधी आश्रमशाळा  यांच्या अध्यक्षेत  परीक्षा व मूल्यांकन नागपुर विद्यापीठाचे संचालक अनिलजी हिरेखान यांच्या  शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष रेड स्वास्तिक सोसायटी नागपुरचे मोहनजी देशमुख , जगन्नाथ गराट  व दै .सकाळ विदर्भचे उपसंपादक  मा .प्रमोद काळबांडे होते प्रमुख अतिथि म्हणून नांदगाव खांडेश्वरचे तहसिलदार परसराम भोसले , चांपाचे सरपंच अतिश पवार होते .
आदिवासी पारधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शैक्षणिक कौशल्य मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजित करण्यात आला होता  याप्रसंगी समाजाती १०वी ,१२वी तसेच. पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सत्कार चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने नागपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यातील  सुमारे ५०  विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. राज्याचे राज्य  आदर्श शिक्षक म्हणून पारधी समाजातील वस्ती असलेल्या राजुलवाडी जिल्हापरिषद शाळेचे मुख्यध्यापक बळीराम चापले यांचे पारधी समाजाच्या वतीने सत्कार करून गौरविण्यात आले .आयोजन बबन गोरामन , धर्मराज भोसले , अनिल पवार , शिवसाजन राजपूत , प्रशांत गोरामन , राहुल राजपूत , शुभम पवार आदींनी परिश्रम केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिश पवार यांनी केले .तर आभार प्रदर्शन बबन गोरामन यांनी केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button