Pandharpur

का घालत आहे पंढरपूर प्रशासन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटला पाठिशी

का घालत आहे पंढरपूर प्रशासन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटला पाठिशी

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये जपाट्याने कोरोना पाॅझिटिव्ह रूग्नांची संख्या वाढत असुन या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हे खाजगी हाॅस्पिटल कोविड व नाॅन कोविड रूग्नांसाठी असुनही या ठिकाणी हाॅस्पिटल प्रशासन बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना नाहक ञास देत आहे तरी ही अशा कठीण परिस्थितीत हे हाॅस्पिटल शासणाने खाजगी हाॅस्पिटलला अधोरेखित केलेल्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसुन येत असुनही पंढरपूर प्रशासन या हाॅस्पिटला का जाणीवपूर्वक पाठीशी घालत आहे हा नागरिकांना पंढरपूर प्रशासनाच्या कामकाजाबाबत पडलेल्या प्रश्नाचं उत्तर नागरीहितासाठी काम करणार्या पंढरपूर मधिल या संबधित अधिकारी यांनी सांगावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

तसेच मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी पंढरपूर नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने ते याच हाॅस्पिटल ठिकाणी उपचार घेण्यासाठी गेले असता या हाॅस्पिटलने त्यांना कारणे देत अॅडमिट करून न घेताच पाठवले असल्याची माहिती मिळत आहे.

जर पंढरपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग अधिकारी यांच्याबरोबरच अशा प्रकारची वर्तवनुक हे हाॅस्पिटल करत असेल तर सर्व सामान्य जनतेच काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आणि हा घडला प्रकार पंढरपूर प्रांताधिकारी व पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना माहिती असुनही ते गप्प का हे अद्याप समजलेले नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button