Surgana

जेव्हा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी खा डॉ भारती पवार व आर. टी. ओ. विभाग कठीण प्रसंगी धावून येतात…..

जेव्हा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी खा डॉ भारती पवार व आर. टी. ओ. विभाग कठीण प्रसंगी धावून येतात…..

विजय कानडे

महाराष्ट्र गुजरात बोरगाव चेक पोस्ट वर नासिक RTO विभाग कर्तव्याबरोबर ह्या कठीण परिस्थितीत माणुसकीही जपण्याचे काम करतोय याचे उदाहरण नुकतेच समोर आले.
आज देश एका कठीण व संवेदनशील परिस्थितीतून मार्गक्रमण करतोय .सर्वत्रच लॉकडाऊन मुळे अघोषित संचारबंदीचे वातावरण .सर्वत्र शुकशुकाट सर्वच बंद त्यातल्या त्यात महाराष्ट्र गुजरात बॉर्डर वर जे बोरगाव चेक पोस्ट आहे तिथे कुठलीही सुविधा उपलब्ध नाही .अश्या परीस्थितीत आपले कर्तव्य बजावत असतांना शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळांच्या गाड्या गुजरात ला जाताय गुजराथ हुन महाराष्ट्रात पुन्हा येतायेत अशा वेळेस वाहनचालक व गाडीबरोबर असणारा शेतकरी यांना खाण्यापिण्याची कुठलीही व्यवस्था नाही .त्यांना रस्त्यात काहीही मिळत नाही हे जेव्हा तेथील RTO विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी भरत कळसकर संपर्क साधत ह्याची कल्पना दिली . शेती माल वाहतूक सुरळीत राहणे कमी RTO अधिकारी व चेकपोस्ट येथील अधीकारी यांच्या संपर्कात असलेल्या खा डॉ. भारती पवार यांनाही ही गोष्ट समजली, RTO भरत कळसकर व खा भरतीताई पवार यांनी तेथील भुकेल्या आणि तहानलेल्या शेतकरी व वाहनचालकांना मोफत जेवणाची व पिण्याची पाण्याची तातडीने व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या .आपल्या लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत तिथे कार्यरथ असलेले ड्युटी ऑफिसर इन्स्पेक्टर श्री सुनील मेहेत्रे, श्री विजय दरगोडे, श्री संदीप निमसे, श्री दिलीप शिंदे तसेच चेक पोस्ट मॅनेजर अमित चव्हाण आणि विभागाची सपोर्ट टीम यांनी त्यांच्या स्वखर्चातून देणगी काढत भुकेल्या शेतकऱ्यांना व वाहन चालकांना मोफत जेवण देत या कठीण समयी माणुसकीचा आगळावेगळा आदर्श निर्माण केला .एकीकडे वाईट अनुभव येत असताना महाराष्ट्र गुजरात बोरगाव चेकपोस्ट वेगळाच पण सुखद अनुभव शेतकऱ्यांना व वाहन चालकांना आल्याने त्यांनी खा. डॉ .भारतीताई पवार व RTO अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मनस्वी आभार मानले आणि आपले कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांमध्येही माणुसकीचा ओलावा जिवंत असल्याची जाणीव सर्वांनाच झाली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button