विठ्ल चे कामगार व सभासद पाळणार काळा दिवस
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कामगार यांनी काल तहसीलदार बेलेकर यांना निवेदन दिले कि गेल्यावर्षी कामगारांचे पगार व शेतकऱ्यांची ऊस बिल मिळावे म्हणून आंदोलन केले होते परंतु कारखान्याचे व्हाईस चेअरमन व संचालक यांनी सत्तेचा गैरवापर करत पोलिसांवर ती दबाव टाकून आठ कामगार व तीन सभासद यांच्यावरती अपहरण करून खून करण्याची धमकी देणे असा गुन्हा दाखल करून सदर आंदोलकांना तीन महिने जेलमध्ये डांबले होते त्यांना जामीन मिळू नये म्हणून प्रयत्नाची पराकाष्टा ही केली होती त्यामुळे कामगारांच्या व सभासदांच्या कुटुंबीयांची प्रचंड परवड झालेली होती त्यांच्या आयुष्यातील हा दिवस काळाकुट्ट झाला होता या प्रकाराला एक वर्ष पूर्ण होत आहे परंतु आज पर्यंत या कामगारांना पगार मिळालेली नाही व सदर कामगारांना कामावरही घेतले नाही अनेक वेळा प्रशासनाकडे व देशाचे नेते शरद चंद्रजी पवार अजित दादा पवार पालकमंत्री भरणे मामा यांच्याकडे निवेदन देऊन सुद्धा या कामगारांना न्याय मिळाला नाही या प्रकाराचा निषेध म्हणून म्हणून दि १७/३ /२००२१ रोजी पंढरपूर तहसील ऑफिस समोर एक दिवस लाक्षणिक उपोषण करून काळा दिवस पाळणार आहोत असे निवेदन पंढरपूर शहर पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना दिले यावेळी बोलताना बळीराजाचे माऊली हळणवर म्हणाले की शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आम्ही आंदोलन करत असतो वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात परंतु विठ्ठल कारखान्याचे चे व्हाईस चेअरमन यांनी निंदनीय हा प्रकार केल्यामुळे आम्ही तीन महिने जेल मध्ये होतो सत्तेचा गैरवापर करून आमच्या वरती अन्याय केलेला आहे विठ्ठल कारखाना अत्यंत चांगला कारखाना या संचालकांच्या गलथान कारभारामुळे डबघाईला आलेला आहे कामगारांना व सभासदांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहणार यावेळी बळीराजाचे नेते माऊली हळणवर शेखर भोसले काशिनाथ लवटे कामगार नेते सागर वाघमोडे रामदास आनंद बिबीशन लवटे यांच्यासह जेलमध्ये बसलेले अन्यायग्रस्त कामगार उपस्थित होते






