Amalner

मागच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल…कशावरून???सर्व ज्योतिषी आहेत का ते घडावं अशी इच्छा आहे??

ढगाळ वातावरणाबरोबरच गढूळ परिस्थिती चा परिणाम होणार मतदानावर??मागच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल…कशावरून???सर्व ज्योतिषी आहेत का ते घडावं अशी इच्छा आहे??

मागच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल...कशावरून???सर्व ज्योतिषी आहेत का ते घडावं अशी इच्छा आहे??

जयश्री साळुंके
अमळनेर
येथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक पंचवार्षिक निवडणुका झाल्या.अमळनेर शहराला अत्यन्त उच्च असा सांस्कृतिक, वैचारिक, प्रबोधनात्मक वारसा लाभलेला आहे.काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या,परिवर्तन झाले.अमळनेर राजकीय क्षेत्रात ही अनेक बदल,आच्छर्यकारी भूकम्प अमळनेर च्या जनतेने पाहिले अनुभवले.मग ती राजकीय व्यासपीठावर झालेली मारामारी असो की निष्ठावान नेत्यांची पक्ष बदल वृत्ती असो…

मागच्या निवडणूकित जे काही प्रकार झाले ते कोणा मुले झाले,त्यामागील राजकारण काय होतं?हा संशोधनाचा विषय आहे. जे घडलं ते तसच घडलं की पडद्या मागे ह्या घटना घडविण्या मागे दुसरंच कोणी तरी हालचाली करत होते?हे सगळे प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहेत.जाणकार जाणून आहेत यामागची राजकीय भूमिका…

आता मात्र मागच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल…असे वारंवार बिंबवले जात आहे.या वेळी खरच घटना घडणार आहे का की घडवली जाणार आहे? MH39 च्या गाड्या फक्त एकच व्यक्ती आणू शकते का दुसरे कोणी ही आणू शकतात.मांडळ येथे सापडलेले गावठी पिस्तुल हा निव्वळ योगायोग आहे की चाल आहे?कदाचित काहीच घडणार नसून उगीचच सामान्य जनतेला मतदानाचा हक्क बाजावण्या पासून वंचित ठेवण्यासाठी सहानुभूती कार्यक्रम तर नाही???विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात हा मुद्दा एकदाही चर्चेत आला नाही. त्यामुळे
सावध रहा.. असे सांगून किंवा प्रचार करून जनतेला घाबरवू नये.

आधीच निसर्गानेही लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकांकडे पाठ फिरवली आहे.पडणाऱ्या पावसाचा आणि वातावरणाचा परिणाम मतदानावर होणार आहे.

अश्या ढगाळ वातावरणात आणखी परिस्थिती गढूळ करू नये… नागरिकांना आवाहन आहे की आपण आपला मतदानाचा हक्क बजवावा..घाबरू नका…असे प्रोत्साहन देण्या ऐवजी भीती निर्माण केली जात आहे आहे.ढगाळ वातावरण आणि गढूळ परिस्थिती यामुळे अमळनेर तालुक्यातील मतदान जास्तीत जास्त 40 ते 50 टक्के होईल असा साधारण अंदाज आहे.सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाने आश्वस्त करावे तसेच जसे “मतदान करा” हा प्रचार केला जात तसा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी सकारात्मक विचार आणि भूमिका विचार जर सोशल मिडिया मार्फत जनतेपर्यंत पोहचले “मतदान करा..बिनधास्त करा”. “प्रशासन आपल्या सोबत आहे”असा संदेश जनते पर्यंत पोहचवा तर नक्की च सामान्य जनता घाबरणार नाही आणि मतदानासाठी बाहेर पडेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button