Pune

? Crime Dairy…”माय मरो अन मावशी जगो” म्हण ठरली खोटी..मावशीनेच दाखवला अल्पवयीन भाचीला पॉर्न व्हिडीओ

? Crime Dairy…माय मरो अन मावशी जगो म्हण ठरली खोटी..मावशीनेच दाखवला अल्पवयीन भाचीला पॉर्न व्हिडीओ

दत्ता पारेकर

पुणे : सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि अन लॉकडावूनच्या प्रक्रिया सुरू आहेत. अश्या काळात आपल्या बहिणीच्या घरी मुलांना विश्वासाने एका बहिणीने आपल्या मुलांना पाठवले होते.पण जेंव्हा आपल्या बहिणीचे कृत्य समजले़ तेव्हा दुसऱ्या बहिणीला मोठा धक्कादायक बसला़.आपल्याकडे ‘माय मरो पण मावशी जगो’ या म्हण प्रचलित आहे. पण या घटनेने तर या म्हणीला ही काळीमा फासला.आपल्या घरी राहायला आलेल्या अल्पवयीन भाचीला आपल्या प्रियकरच्या मदतीने तिने पॉर्न व्हिडिओ वारंवार दाखविल्याची घटना समोर आली आहे़. या घटनेत बकोंढवा पोलिसांनी प्रियकरासह मावशीला अटक करण्यात आली आहे.दोन्ही आरोपींची कोरोना चाचणी केल्यावर ते दोघेही पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलिसांची एकच धांदल उडाली़ आहे.

कोंढवा येथील एका महिलेने लॉकडाऊनच्या काळात आपल्या ४ मुलांना लहान बहिणीकडे पाठविले होते़. ही बहिणी घटस्फोटीत आहे आणि आपल्या एका मित्राबरोबर उंड्री येथे राहते़ असे माहितीतून समोर आले आहे. लॉक डावूनच्या काळात पीडित मुलगी आणि तिचे 3 भावंड एप्रिल, मे आणि जूनमध्ये आपल्या मावशीकडे राहत होती़. त्यावेळी ती १६ वर्षाच्या या अल्पवयीन मुलीला मावशीने व तिच्या मित्राने पॉर्न व्हिडिओ वारंवार दाखविला़. ही मुलगी ऑगस्टमध्ये आपल्या आईकडे परत आली़, तेव्हा तिने घडलेला हा सर्व प्रकार आईला सांगितला़. आईने थेट कोंढवा पोलीस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादिनूसार पोलिसांनी दोघांना अटक केली़ आहे.

दोघांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. त्यांना कारागृहात पाठविण्यापूर्वी कोविड १९ ची चाचणी घेण्यात आली़ त्यात दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले़ आहेत.त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले़ असून तपासादरम्यान दोघांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची चाचणी घेण्यात आली आहे़.संपर्कातील लोकांचे अहवाल येणे बाकी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button