वर्डी ग्रामपंचायतीच्या प्रकाशकाच्या खुर्चीवर टाकला हार …
रजनीकांत पाटील
चोपडा:- वर्डी गावाच्या शासनाने नियुक्ती केलेल्या प्रशासक एस टी मोरे यांना शासनाने वर्डी ग्रामपंचायत ची मुदत संपल्यानंतर प्रशाशक म्हणून नियुक्ती केली, तरी १ महीन्या पासुन ते वर्डी गावात फक्त एकदा आले त्या नंतर ते फिरकलेच नाही, गावातील समस्यांचे निवारण करण्यासाठी शासनाने यांना नियुक्ती केली असते , पण पंचायत कार्यालयात जर प्राशासकीय अधिकारीच नसेल तर नागरीकांच्या समस्या कोन सोडवनार हा प्रश्न गावातील नागरीकांना पडतो, नागरीकांना काही कागदावर सही घेण्यासाठी फोन लावतात तर एस डी मोरे महाशय उडवाउडवीची उत्तर देतात, पंचायत कार्यालयातील ग्रामसेवक हे प्रशासनाच्या परवानगी शिवाय काम करू शकत नाही, म्हणून शासनाने ह्या समस्येकडे त्वरीत लक्ष द्यावे, असे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले यावेळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष लहुश धनगर,माजी उपसरपंच सचिन डाभे,भरत पाटील, गुलाब ठाकरे, अमोल पाटील, जितेंद्र पाटील, श्याम नायदे, प्रदीप शिंदे उपस्थित होते,






