भाजप वीज बिल वसुलीवरून भाजपा शहराध्यक्ष आणि महावितरणच्या अधिकाऱ्यात शाब्दिक चकमक
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : वीज बिल बसुलीसाठी महावितरणकडून ग्रामीण भागात थेट डीपी बंद करण्याचे प्रकार सुरु असतानाच शहरातही आता थेट संपूर्ण पोल लाईनच बंद करण्याचा इशारा महावितरणचे कर्मचारी देऊ लागले खरे परंतु अनेकांनी वीज बिलाचा एक हप्ता भरून अजून आठ -दहा दिवस झाले नाहीत तो पर्यंतच लगेच उरलेले बिल भरा असे सांगत वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार पंढरपूर शहरातील लखुबाई झोपडपट्टी,व्यास नारायण व अंबिका नगर झोपडपट्टी परिसरात होत असल्याचे समजताच येथील रहिवाशी प्रचंड संतप्त झाले व तणावाचे वातावरण निर्माण झाले.याची माहिती मिळताच शहर भाजपा अध्यक्ष व या प्रभागाचे नगरसेवक विक्रम शिरसट यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली.लोकांनी काही प्रमाणात वीज बिल भरले आहे तर काही लोक भरण्यास तयारही आहेत परंतु सरसकट लाईन बंद करू नका अन्यथा नागिरकांच्या रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिला.परंतु महावितरणचे कर्मचारी ऐकण्यास तयार नसल्याचे पाहताच विक्रम शिरसट यांचा पारा चढला आणि शाब्दिक चकमक होऊ लागल्याचे पाहताच वातावरण तणावपूर्ण बनले. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याना सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात भाजपाने निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले व अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर ने उड्डाण केल्यानंतच त्यांची मुक्तता केली होती






