भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी साधला पत्रकारांशी संवाद
सुरेश कोळी
भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे आज त्यांच्या जळगाव येथील निवास स्थानी आले असता पत्रकारांनी त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारले असता त्यांनी काय म्हटलंय ते पाहूया….
जळगाव जिल्हायतील हिंगोणे येथे झालेल्या अपघातात बारा लोकांचा बळी गेला आहे मात्र हे अवैध प्रवासी वाहतुकीचे बळी असल्याच खडसे यांनी म्हटलं आहे,अवैध रीतीने राख आणि रेती वाहतूक करण्यात येत आहे त्या कडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे त्यावर नियंत्रण आणले तर निरपराध लोकांचं जीव वाचू शकतो ,मृतांच्या नातेवाईकांना सरकार ने आर्थिक मदत करायला हवी मागणी ही खडसे यांनी केली आहे.
वर्धा जिल्हयात हिंगणघाट येथे शिक्षकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयन्त केला जातो ही ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे,सध्याच्या काळात अनेक घटना पाहता महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे,सरकार प्रयत्न करीत असले तरी अशा मानसिक विकृती च्या विरोधात घटना घडल्या नंतर त्वरित कठोर शासन करण्यात आले,न्यायालयाचे निर्णय त्वरित मिळाला तर अशा घटनांत गुन्हेगार लोकांवर वचक निर्माण होऊ शकेल आणि त्यावर प्रतिबंध लागू शकतो
दिल्लीच्या निवडणुकीचा विचार केला तर भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिस्थेची केली आहे या निवडणुकी साठी संपूर्ण देशभरातील आमदार खासदार आणि नेते या ठिकाणी जाऊन प्रचाराचे काम करीत आहेत,या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एखादया कार्यकर्त्या प्रमाणे घरोघर जाऊन प्रचार पत्रक वाटत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे,त्यांचं अभिनंद केलं पाहिजे,त्यांच्या प्रयत्नाला यश मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.
मनसेने बांगला देशवासियांना मुंबई मधून चले जावं ची पोष्टर बाजी सुरू केली आहे या घटनेच खडसे यांनी समर्थन केले आहे,बांगला देश मधून मोठ्या संख्येने लोक भारतात येतात आणि या ठिकाणी येऊन अनेक जण गुन्हेगारी करतात त्यामुळे त्यांना देशाबाहेर काढलाच पाहिजे ,अगोदरच देशाची लोक संख्या मोठी असत्ताना त्यात यांची भर पडल्याने नागरी सुविधांवर देखील त्याचा परिणाम होत असल्यानेअशा विचाराशी आपणही सहमत आहोत,केंद्रानेही आशा प्रकारची भूमिका अगोदरच घेतली आहे त्यामुळे मनसेच्या या भूमिकेचं आपण स्वागत करतो
अस मत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे.






