अॅग्रोवर्ल्डची जळगावात तिसरी बांबू कार्यशाळा शनिवारी दि.२६ सप्टेंबर रोजी; नावनोंदणी सुरू
जळगांव:- रजनीकांत पाटील
अॅग्रोवर्ल्डची जळगावात तिसरी बांबू कार्यशाळा शनिवारी दि.२6 सप्टेंबर रोजी; नावनोंदणी सुरू
मागील बॅच मधील शेतकऱ्यांनी पाठविले 14 नवीन शेतकरी
बांबू कार्यशाळेला का मिळतोय विक्रमी प्रतिसाद ? काय आहे राष्ट्रीय बांबू अभियान..?? लोक बांबू शेतीकडे का वळताय ? एकाच गाव व परिसरातील शेतकरी या मिशनमध्ये सहभागी झाल्यास काय फायदा होणार..??
गट शेती फायदेशीर…?
हे जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच कार्यशाळेत सहभागी व्हा. फक्त 6 जागा शिल्लक
सोशल डिस्टनसिंगमुळे एका बॅचला फक्त 20 प्रशिक्षणार्थी.. बांबू शेतीतील तज्ज्ञ वक्ते संदीप माळी, उमेश सोनार, राष्ट्रीय बांबू मिशनचे समन्वयक रमाकांत पाटील यांचे मार्गदर्शन..
आधीच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविल्याने नोंदणी वाढल्यामुळे शनिवारी (दि.२6 सप्टेंबर) पुन्हा “बांबू शेती कार्यशाळा” आयोजित केली आहे.
काय आहे राष्ट्रीय बांबू मिशन, कार्यशाळेत बांबू लागवड, संगोपन, प्रजातीची ओळख व जमिनीनुसार लागवडीसाठी कोणत्या जातीची निवड करावी यासह मार्केटिंग व प्रक्रिया उद्योग व शासकीय योजना, अनुदान यावर बांबू तज्ज्ञांचे सविस्तर व सखोल मार्गदर्शन मिळाले. यासह बांबू लागवड केलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे अनुभव देखील उपस्थितांना ऐकायला मिळाले. अशीच कार्यशाळा शनिवारी (दि.२6 सप्टेंबर) रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेदरम्यान पुन्हा आयोजित केली असून इच्छुकांनी संपर्क साधावा…






