Nashik

लाखो रुपयांचा गांजा जप्त: आडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी

लाखो रुपयांचा गांजा जप्त: आडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी

शांताराम दुनबळे

नाशिक .-धुळ्यावरून नाशिक मार्गे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कारमधून आडगाव पोलिसांनी पाच लाखांचा गांजा जप्त केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आडगाव पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या नवव्या मैलाच्या परिसरात ही कारवाई केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे धुळ्यावरून मुंबईच्या दिशेने एका गाडीमध्ये साधारणपणे 30 किलो गांजा घेऊन कार जात असताना पोलिसांनी सापळा रचून गाडीसह ५जणांना ताब्यात घेतलं आहे.

गाडीची झडती घेतली असता पोलिसांना 30 किलो गांजा आढळून आला आहे. हा गांजा हे ५ जण धुळ्यावरून मुंबईकडे घेऊन जात होते. आडगाव पोलिसांनी ५जणांसह, मुद्देमाल, गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ९लाख १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भिसन पावरा, भूषण भोई, राजेश पावरा, विकास पावरा, कमलसिंग पावरा अशा 5 जणांना पोलिसांनी एनडीपीएसी कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव, आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर, बिडगर, पोलीस उपनिरीक्षक माळी, पोलीस शिपाई जाधव, पवार, खुळे, कहंडळ, गांगुर्डे, वाल्मिक पाटील आदींनी ही कारवाई केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button