sawada

सावदा येथे ना.वि.ह.पाटील कन्या शाळेत वार्षीक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

सावदा येथे ना.वि.ह.पाटील कन्या शाळेत वार्षीक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

“या आधी देखील शाळेतील वर्ग शिक्षक सचिंन सकळकळे यांच्या मार्गदर्शनाखाली गीतांजली चांदेलकर नववीचे शिक्षण घेत असताना शाळेतील सरासरी १०० मुलींमध्ये अभ्यासात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने तीस शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी सुध्दा शाळेत प्राचार्याची भुमिका साकारल्याचा मान मिळाला होता.”
—————————————-

सावदा प्रतिनिधी /युसूफ शाह.

रावेर तालुक्यातील सावदा येथे नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या शाळेत आज दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी वार्षीक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी
शाळेतील ५ वी ते १० वी वर्गातून अभ्यासाच्या आधारावर प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थी मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी सालाबाद प्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीत एकूण १० विद्यार्थिनींना पारितोषिक वितरण करण्यात आले.यात दाहावीतील विद्यार्थींनी कु.गीतांजली प्रदिप चांदेलकर यांनी सन २०२१-२२ या वर्षात इ.९ वीच्या साधारण ९० मुलींमध्ये शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याबद्दल ह्या विद्यार्थींनीचा सत्कार व सन्मान शहराचे माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्या हस्ते रोख रक्कमचे पारितोषिक वितरण करण्यात आले.सदरील विद्यार्थ्यां मुलींमध्ये शिक्षणाची आवड, गोळी व अभ्यासाची जिद्द निर्माण व्हावी.या उद्देशाने शहर व परिसरातील १२५ दात्यांनी बक्षीसासाठी आर्थिक रक्कमची ठेव ठेवलेली आहे.तरी याप्रसंगी प्रांत अधिकारी कैलास कडलक फैजपूर,गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे,मुख्याधिकारी किशोर चव्हाण,कर्तव्यदक्ष ए.पी.आय. जलींदर पळे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,उद्योजक मनोज पाटील,प्राचार्य पुष्पलता ठोंबरे,पर्यावेक्षक प्रकाश.जी. भालेराव.सह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button