बौद्धिक विकास व्हावाच तसेच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा या हेतूने जिल्हा परिषद शाळा साळशिंगी येथे मैदानी स्पर्धा
जितेंद्र गायकवाड
जळगाव, दि.३जून :- क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बोदवड पंचायत समिती सभापती किशोर भाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले, “विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धे पर्यंत झेप घ्यावी”असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले .साळशिंगी तालुका बोदवड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची शारीरिक मैदानी स्पर्धा घेण्यात आली, तसेच जिल्हा परिषद शाळा साळशिंगी येथे वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात,त्याचप्रमाणे हा मैदानी खेळ सुद्धा घेण्यात आले .खेळण्यास आलेल्या स्पर्धेक याना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले,जे विद्यार्थी प्रथम क्रमांकावर आले त्यांना चषक देण्यात आले तसेच द्वितीय, तृतीय आलेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा परिषद शाळा साळशिंगी येथील शिक्षक वर्ग हा नेहमी विद्यार्थ्यांना पुढे कसे जाता येईल व त्यांच्या कलागुणांचा विकास कसा होईल यासाठी नेहमी तयार असतात. मैदानी खेळा मध्ये कबड्डी, लांब उडी, उंच उडी ,100 मीटर धावणे, गोळा फेक ,खो-खो., इत्यादी खेळ खेळण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास भाऊ चौधरी समाजसेवक जितेंद्र चौधरी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ पाटील तसेच इतर शिक्षक वर्ग कुसुमताई नेमाडे शैलेंद्र ,अहिरे रवींद्र भालेराव, राजेंद्र केदारे
पंच पंच म्हणून पुढील -प्रशांत कानडे ,राजेश पाटील, मंगेश तिडके, कोकाटे सर, दिपक माळी ,निलेश महाजन, निलेश नेरकर ,प्रीतम धनगर ,गीतांजली बोरोले ,गीता लढे, पूनम वाघोदे इत्यादी उपस्थित होते






