Amalner

शिरूड विकास मंच व संभाजी ब्रिगेड,काळ भैरव मित्रमंडळ शिरूड येथील माजी विदयार्थी यांचा गौरव समारंभ

शिरूड विकास मंच व संभाजी ब्रिगेड,काळ भैरव मित्रमंडळ शिरूड येथील माजी विदयार्थी यांचा गौरव समारंभ

प्रतिनिधी : रजनीकांत पाटील अमळनेर


अमळनेर ता : शिरूड भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर जमलेले माजी विदयार्थी यांचा गौरव करतांना आपल्या गावात शिक्षण घेऊन पुणे विद्यापीठात नोकरी असलेले व आपला छंद म्हणून कलाक्षेत्रात विशेष म्हणजे अहिराणी गाण्यात Action Hero म्हणून काम केले तसेच विविध दूरदर्शन कार्यक्रमात रोल असणारे व्यक्तिमत्व गावातील प्रतिष्ठित शेतकरी श्री नारायण सुकलाल पाटील यांचे नातू श्री. प्रशांत साहेबराव पाटील उर्फ बंडू दादा रा .तळोदा ता चाळीसगाव
यांचा सत्कार दै गावकरीचे पत्रकार श्री शरद कुलकर्णी सर व तरुण मित्र अक्षय बोरसे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तसेच आपल्या वडिलांच्या उत्तरकार्यात शिरूड जि प शाळेसाठी 21000 रु देणगी जाहीर केलेले श्री पद्माकर गुलाबराव पाटील यांनी वरील रकमेचा चेक प्रा सुभाष जीभाऊ व चंदू सर यांना सुपूर्द केला त्यांचा सत्कार श्री पुंजु बापु व बाळू दादा यांनी केला.
तसेच नुकतीच तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य म्हणून निवड झालेले शेतकरी नेते प्रा सुभाष जीभाऊ यांचा सत्कार श्री पांडुरंग पाटील व इंजि प्रफुल्ल पाटील यांनी केला प्रमुख पाहुणे श्री देवरे सर यांचा सत्कार योगेश पाटील यांनी केला
सुत्रसंचालन श्री चंद्रकांत पाटील सर यांनी केले मनोगतात प्रशांत दादा यांनी शिरूडकर मंडळींच्या ऋणात राहताना पुण्यात नेहमीप्रमाणं सर्वतोपरी सहकार्य करत राहू असे सांगितले
श्री पद्माकर रावसाहेब यांनी गावासाठी नियमित मदत करण्यात मी माझं सौभाग्य समजतो असे सांगितले
श्री सुभाष जीभाऊ यांनी गावातील मंडळींना वरील योजनेतएकही रुपया खर्च न करता लाभ देण्याचे आश्वासित केले व तरुणांनी स्वतःला आणि गावाला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले
कार्यक्रमालाश्री अभिमन माळी श्री नारायण आण्णा शशी दादा व भालू नाना, रंगराव पाटील, नितीन पाटील,सुनील महाजन, विरभान पाटील,वैभव पाटील,पत्रकार रजनीकांत पाटील व तरुण मित्र मंडळ उपस्थित होते
दीपावलीच्या शुभेच्छा सह कार्यक्रमाची सांगता झाली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button