Faijpur

Faizpur: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिकसभेवर नरेंद्र नारखेडे यांची निवड

Faizpur: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिकसभेवर नरेंद्र नारखेडे यांची निवड

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर केदारनाथ कवडीवाले, भानुदास येवलेकर, नरेंद्र नारखेडे, केतन ढाके, जयंत उत्तरवार, नेहा जोशी, रामसिंग वळवी आणि मिनाक्षी निकम या आठ जणांचे नामनिर्देशन महाराष्ट्राचे कुलपती तथा राज्यपाल यांनी केले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अंतर्गत कलम २८(२) (यू) अन्वये कुलपती हे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या दहा व्यक्तिंचे अधिसभेवर नामनिर्देशन करतात. राजभवनातून राज्यपालांचे प्रधान सचिव श्री. संतोषकुमार यांच्या स्वाक्षरीचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर आठ जणांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. त्यामध्ये केदारनाथ कवडीवाले (दोंडाईचा, जि. धुळे), भानुदास येवलेकर (जळगाव), नरेंद्र नारखेडे (फैजपूर, जि. जळगाव), केतन ढाके (जळगाव), जयंत उत्तरवार (नंदुरबार), नेहा जोशी (जळगाव), रामसिंग वळवी (मु.कंजाला, पो. भगदरी, ता. अक्कलकुव्वा, जि. नंदुरबार) आणि मिनाक्षी निकम (चाळीसगाव) यांचा समावेश आहे या निवडीबद्दल. नरेंद्र नारखेडे यांचे सर्वत्र स्वागत होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button