Maharashtra

आ शिरीष चौधरींच्या प्रयत्नातून मिळाली मंजुरी ,6 पुलांसह 5 महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश

राज्यांच्या अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात अमळनेर मतदार संघासाठी 31 कोटींचा निधी

आ शिरीष चौधरींच्या प्रयत्नातून मिळाली मंजुरी ,6 पुलांसह 5 महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश

आ शिरीष चौधरींच्या प्रयत्नातून मिळाली मंजुरी ,6 पुलांसह 5 महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश

अमळनेर राज्यांच्या अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात अमळनेर मतदार संघासाठी 31 कोटींचा निधी मंजूर झाला असून यात 6 पुलांसह 5 महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश आहे,आ शिरीष चौधरी यांच्या मागणीनुसार व सततच्या प्रयत्नांमुळे ही कामे मंजूर झाली असून यामुळे जनतेतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

             दरम्यान यासंदर्भात विधान परिषद सदस्या आ सौ स्मिता वाघ यांनी या अर्थसंकल्पात त्यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील रस्त्यांसाठी 9 कोटींचा निधी मंजूर झाला असे प्रसिद्धीस देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र  प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी उतावीळपणा दाखविल्याने त्याच फसल्या कारण प्रत्यक्षात अमळनेर मतदारसंघात 9 कोटी नव्हे तर 31 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असुन त्यांनी पत्रात नमूद केलेली कामे आणि प्रत्यक्षात मंजूर असलेली कामे यात तफावत आहे,यामुळे यापुढे तरी अपूर्ण माहितीवर प्रसिद्धीचा आटापिटा त्यांनी करू नये असा सल्ला आ शिरीष चौधरी यांनी दिला आहे.तसेच या कामांना मंजुरी दिल्याबद्दल राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, व पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आ चौधरीं यांनी आभार मानले आहेत.

          विशेष म्हणजे करणखेडा ते मुडी बोरी नदीवर पुलाची किंमत 8 ते 10 कोटी एवढी होत होती परंतु दोन्ही गावांना जोडणारे रस्ते व छोटे मोठे पूल लक्षात घेता वाढीव 15 कोटींची मंजुरी मिळाली आहे.यामुळे हे काम समाधानकारक होणार आहे.

*हे आहेत नव्याने होणारे 6 पूल*

प्रजिमा 3 करणखेडा ते मुडी दरम्यान बोरी नदीवर पुलाचे बांधकाम करणे 15 कोटी,

गडखांब येथे रा.मा.क्र 15 वरील किमी 73/300 पूल बांधणे 2 कोटी,

शिरसाळे येथे प्रजिमा 51 किमी 30/500 मध्ये पुलाचे बांधकाम करणे 1कोटी 50 लाख,

तरवाडे येथे प्रजिमा 51किमी 32/500 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे 1कोटी 20 लाख,

कलाली निभोरा गावाजवळ प्रजिमा 3 किमी 3900/3930 लहान पुलाचे बांधकाम करणे 80 लाख,

निम ते भिलाली प्रजिमा 52 वर किमी 79/400,82/800 व 83/00दरम्यान लहान पुलाचे बांधकाम करणे 1 कोटी,

*हे आहे 5 महत्त्वपूर्ण रस्ते*

फाफोरे ते अमळनेर प्रजिमा 49 किमी 0/00 ते 8/500 रस्ता सुधारणा करणे 3 कोटी,

भोलाने ते बहादरपूर प्रजिमा 48 किमी 2/00 ते 7/00 ची सुधारणा करणे 2 कोटी 50 लाख,

शहापूर ते भिलाली रस्ता प्रजिमा 52 किमी 81/600 ते 86/00 ची सुधारणा करणे 2 कोटी,

तरवाडे ते शिरसाळे प्रजिमा 51 किमी रस्ता 31/400 ते 34/200 ची सुधारणा करणे 1 कोटी,

अमळनेर – मारवड प्रजिमा49 किमी 33/00 ते 44/00 वळण रस्ता रुंदीकरण करणे 1 कोटी,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button