Dhule

बोराडी येथे आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी ह्या कोरोना योद्ध्यांचा जय आदिवासी युवा शक्ती(जयस) तर्फे सन्मान व सत्कार.!

बोराडी येथे आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी ह्या कोरोना योद्ध्यांचा जय आदिवासी युवा शक्ती(जयस) तर्फे सन्मान व सत्कार.!

राहूल साळुंके धुळे

धुळे : आज १३ फेब्रुवारी बोराडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी ह्यांनी कोविड माहामारीच्या भयावह अश्या कठीण काळात संपूर्ण भारत एकजूट होऊन महामारिशी लढत असताना अशा कठीण परिस्थितीत आरोग्य विभागातील लोक करीत असलेली सेवा अतुलनीय आहे, ह्यांच्या ह्या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक नवीन उदाहरण ठेवले आहे, जेव्हा संपूर्ण जग, देशातील तसेच परिसरातील लोक घाबरून होते लॉकडाऊन मधे घरातच होते त्यावेळेस त्यांची देवरुपी कार्य, वैद्यकीय व आरोग्य सेवा अभिमानास्पद आहे ह्यांचे देवरुपी महान कार्य पाहून जय आदिवासी युवा शक्ती(JAYS) महाराष्ट्र, शिरपूर टीम तर्फे “कोरोना योद्धा” गौरव सन्मान पत्राने सन्मानित करण्यात आले.

ह्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलिमा देशमुख, डॉ.सुनील पावरा, डॉ.चेतना महाले, डॉ.अनंत पावरा, डॉ.किरण पाटील, डॉ.महेश पावरा, डॉ. संजय पावरा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य कर्मचारी ह्यांना कोरोना योद्धा चे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

ह्यावेळी जयस महाराष्ट्रचे उपाध्यक्ष व वैद्यकीय अधिकारी डॉ.हिरा पावरा, जयस शिरपूर अध्यक्ष भूपेश पावरा, जयस शिरपूर उपाध्यक्ष श्री.जगदीश पावरा, जयस कार्याध्यक्ष पोलीस पाटील मनोज पावरा, जयस शिरपूर सचिव सर्जेराव पावरा ह्यांनी कोरोना योद्ध्यांचे सन्मान व गौरव केला व आभार मानले.

शेवटी वैद्यकीय आधिकारी डॉ.सौ. निलिमा देशमुख ह्यांनी जयस टीमचे आरोग्य टीम मार्फत आभार मानले व सर्व कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button