Chopda

पोलीस स्टेशन मधील दुचाकी संबंधित मालकाने घेऊन जावे: शहर पोलिस स्टेशन

पोलीस स्टेशन मधील दुचाकी संबंधित मालकाने घेऊन जावे: शहर पोलिस स्टेशन

योगेश पवार चोपडा

चोपडा : चोपडा शहर पोलीस स्टेशनला अनेक वर्षापासून बेवारस स्थितीत गंजलेल्या तसेच तुटलेल्या स्थितीत मोटार सायकली पडलेल्या असुन जळगाव पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयाकडील बेवारस वाहन निर्गती मोहीमे अंतर्गत सदरील मोटार सायकल ह्या त्यांच्या मुळ मालकांना परत द्यावयाच्या आहेत.तरी सदरील मोटार सायकल ह्या ज्या कोणाच्या असतील त्यांनी चोपडा शहर चोपडा शहर पोलीस स्टेशनला येऊन आपल्या वाहनांची ओळख पटवुन परत घेवुन जावे. त्या करीता प्रभारी अधिकारी अवतारसिंग ठाकुरसिंग चव्हाण मो.नं. 8087000215 यांच्याशी किंवा लेखनिक हवालदार विद्या पांडुरंग इंगळे मो.नं. 7020305745 किंवा 02586-220333 या क्रमांकावर संपर्क साधुन आपल्या मोटार सायकलची मुळ कागदपत्र दाखवुन मोटार सायकल ताब्यात घेण्याचे आवाहन चोपडा शहर पोलिस स्टेशन कडून करण्यात आले आहे. अन्यथा सदरील वाहनांचे परिवहन कार्यालयाकडुन मुल्यांकन काढुन त्यांचा पोलीस अधिक्षक यांच्या आदेश प्राप्त होताच जाहीर लिलाव करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button