लोकवर्गणीतून वेळोदे येथे उदया जि.प.शाळेत काॅरोन्टाईन सेंटरचे तहसीलदारांच्या हस्ते उदघाटन..
लतीश जैन चोपडा
वेळोदे : तालुक्यातील वेळोदे येथे लोकवर्गणीतून उद्या दि.१९ रोजी ग्रामपंचायत व देणगीदाच्या सहकार्याने ९ वाजता जि.प.शाळेत काॅरोन्टाईन सेंटरचे उद्घाटन तहसीलदार यांच्या हस्ते होणार आहे. गावातील कोरोना पॉझिटीव्ह जे पेशंट असतील त्यांनी ९ वाजता जि.प शाळेत हजर रहावे जेवणासाठी संपुर्ण किराणाची व युज& थ्रो जेवणाच्या प्लेट ची व्यवस्था विजय नेमीचंदजी जैन हे करुन देत आहेत. दररोजच्या नाश्त्याची व आॅक्वाच्या पाण्याची सुविधा अरुण प्रल्हादराव सोनवणे हे करुन देत आहेत. दोन वेळेची चहाची व्यवस्था संजय नारायण बोरसे हे करुन देत आहे.
जि.प.शाळेत दोन रुम धूऊन सॅनेटाइझ करुन तयार करण्यात आलेल्या आहेत. यासाठी मोलाचे सहकार्य मनोज बोरसे, ग्रामसेवक, पोलीस पाटील,वसंत करंदीकर, ग्रामपंचायत कर्मचारी शरद बोरसे, प्रफुल्ल, यांचे लाभत आहे.
दररोजच्या स्वयंपाकासाठी व गाद्या साठी निधीची आवश्यकता असल्याने ज्यांना निधी द्यावे असे वाटत असेल अशा देणगी दारांनी सुप्रभात फर्टीलायझर येथे देण्याचे करावे.
उद्या काॅरोन्टाइन सेंटरच्या उदघाटनाला चोपड्याचे कृती समितीचे अध्यक्ष एस बी नाना डाॅ.देवराज डाॅ.प्रदीप लासुरकर ,डाॅ.राहुल पाटील, हे उपस्थित राहणार आहेत. आपणही कोविड नियमाचे पालन करुन उपस्थित रहावे .या पुढे गावातील होम कोरनटाईन पुरुषांना शाळेतच शासन आदेशानुसार राहावे लागेल आणि पॉजिटीव्ह रुग्ण गावात फिरताना आडळल्यास शासन निर्देशां प्रमाणे पोलीस केस होईल यांची ग्रामस्थानी नोद घ्यावी.
या ठीकाणी आशावर्करांचेही मोलाचे सहकार्य राहणार आहे.कोर्टाईन सेंटर मध्ये औषधोपचार हातेड शासकीय प्राथमिक उपकेंद्रमार्फत केले जातील.






