तपसे चिंचोलीत पाण्यासाठी महिलाचा ग्रामपंचायत वर रोष
ग्रामपंचायतवर काढला रिकाम्या घागरी घेऊन मोर्चा
Bdo शी संपर्क साधूनही भेटीला दिला नकार,
राजकीय दबावाखाली अधिकारी काम करत असल्याचा जनतेचा दावा
लातूर प्रतिनिधी :-लक्ष्मण कांबळे
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली गावात ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून गावातील टाक्यांना वेळेवर पाणीपुरवठा केला जात नसल्याने ग्रामपंचायत विरोधात ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील कोणतीही समस्या आली त्याचे निरसन करण्यासाठी अधिकारी वर्गाकडून प्रचंड टाळाटाळ केली जाते.
संतप्त झालेल्या आज वार्ड क्रमांक चार मधील महिलांनी ग्रामपंचायत वर घागरी घेऊन मोर्चा वळवला होता.
यावेळी संगीता पळसे , वनिता येरणुळे,बबीता गरड,धोंडाबाई बलसुरे,द्रोपती येरनुळे, राजाबाई येरनुळे,भामाबाई येरनुळे, शारदाबाई तेलंग,पदमीनबाई पळसे,सविताबाई पळसे,जरिनाबी सय्यद,झाकिराबी पठाण, फातिमा पठाण,उशाबाई पळसे, राजाबाई पळसे,मंगलबाई पळसे, केशरबाई येरनुळे,भागाबाई पळसे,शालुबाई येरनुळे,कालिंदाबाई येरनुळे, सुमनबाई गरड आदी महिला उपस्थित होत्या.
संबंधित पाणीप्रश्नासाठी ग्रामविकास अधिकारी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता खूप वेळ संपर्क होऊ शकला नाही ,संतप्त झालेल्या महिलांना गावच्या उपसरपंच सोमेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव पाटील यांनी येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल या आश्वासनावर महिलांनी मोर्चा माघार घेतली.मोर्चा माघार घेतल्यानंतर ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत ला उपस्थित झाले आणि येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल याचे आश्वासन दिले आहे.






