खाजगीकरणाच्या विरोधात भिम आर्मी चे निवेदन
लक्ष्मण कांबळे
केंद्र सरकारने एअर इंडिया , रेल्वे , LIC सह अजून बरेच काही विक्रीला काढले असून ह्या सरकारी क्षेत्रात सातत्याने होत असणाऱ्या खाजगिकरणाविरोधात आणि इतर खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे ह्या मागणीसाठी २४ सप्टेंबर रोजी *भिम आर्मी* *च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भारताच्या सन्माननीय राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले निवेदनांच्या माध्यमातून खाजगिकरणाविरोधात भिम आर्मी च्या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
फाटके शर्ट घालून केला निषेध..
यावेळी निवेदन देत असताना भिम आर्मी चे महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे. लातुर जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे ,जिल्हा सचिव बबलू शिंदे ,शहर अध्यक्ष बाबा ढगे, शहर महासचिव बबलू गवळे, शहर उपाध्यक्ष आकाश आदमाणे रेणापूर ,ता संघटक कार्तिक गायकवाड ,सिद्धांत कांबळे,सह भिम आर्मी चे अनेक कार्यकर्ते हजर होते.






