Pandharpur

संचारबंदी ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघ यात्रेत पंढरीत संचारबंदीचा आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून लागू

संचारबंदी !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघ यात्रेत पंढरीत संचारबंदीचा आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून लागू

रफीक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणी परिसरातील दहा गावांत दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे.
राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रभाव वाढत असताना गेल्या तीन दिवसांपासून पंढरीत माघी यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे. याबाबत नागरिक चिंता व्यक्त करीत होते परंतु रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीचा आदेश काढला आहे. २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते २३ फेब्रुवारी रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी पंढरपूर शहर आणि परीसारातील दहा गावात लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहरासह गोपाळपूर, वाखरी, लक्ष्मी टाकळी, गादेगाव, कोर्टी, चिंचोली भोसे, कौठाळी, शिरढोण, भटुंबरे, शेगाव दुमाला या गावात या संचारबंदीची अंमलबजावणी होणार आहे.
दशमी आणि एकादशी दिवशी विठ्ठल दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने आधीच जाहीर केलेला आहे. मंदिर समितीच्या तीन सदस्यांच्या (सपत्नीक) हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात येणार असून या दिवशी मानाच्या हभप वासकर महाराज यांच्या दिंडीस प्रातिनिधिक स्वरुपात पाच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. माही यात्रेनिमित्त पंढरीकडे येणाऱ्या पायी दिंड्यांना प्रतिबंध करण्यात आला असून मठातील वारकरी संख्येवरही नियंत्रण आणण्यात आले आहे. वारी संपेपर्यंत मठाची तपासणी करण्यात येणार असून मठात वास्तव्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घालण्यात आले असून एस टी चा प्रवास बंद करण्यात आला नसला तरी सर्वसामान्य प्रवासी मंदिरापासून दूर उतरतील याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button