Amalner

Amalner: शिवसेना शहरप्रमुख संजय पाटील आणि तालुका संघटक महेश देशमुख यांनी दिला राजीनामा…

Amalner: शिवसेना शहरप्रमुख संजय पाटील आणि तालुका संघटक महेश देशमुख यांनी दिला राजीनामा…

अमळनेर शिवसेनेचे अमळनेर शहर प्रमुख संजय कौतिक पाटील आणि तालुका संघटक महेश देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून महेश देशमुख यांनी शेतकी संघाच्या प्रशासकीय सदस्य पदाचाही राजीनामा शेतकी संघ सचिवांकडे दिला आहे. पदांचा राजीनामा दिला असला तरी आम्ही शिवसेनेतच असून शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अमळनेर येथील शिवसेनेचे शहर प्रमुख संजय कौतिक पाटील व तालुका संघटक महेश देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला त्यांचे सोबत अमळनेर तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांनीही प्रवेश घेतला आहे. तत्पूर्वी शहर प्रमुख संजय पाटील व तालुका संघटक महेश देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे यांचेकडे सादर केला त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केल्याची जाहीर केले .गुलाब भाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी संजय कौतिक पाटील व महेश देशमुख ,लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात महेश देशमुख यांनी गुलाबराव पाटील हे सर्व सामान्यांचे नेते असून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्य आणि आता देशात करणार आहेत. या अनुषंगाने त्यांना संघटनात्मक पाठबळ देणे हे आमचे कर्तव्य असून गेली अनेक वर्षे आम्ही गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहोत.शिवसेना जिल्ह्यात मजबूत करण्यात गुलाबराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच आम्ही शिवसैनिक च आहोत आणि राहू….असे मत व्यक्त केले आहे.

या तीन राजीनाम्यामुळे शहर व तालुक्यातील राजकारणाची समीकरणे बदलताना दिसत आहेत. नुकतेच नवनिर्वाचित मंत्री गुलाबराव पाटील यांचे जोरदार स्वागत देखील अमळनेर मध्ये झाले आणि त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले आहे. “राजभवना”त झालेले स्वागत त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले कार्यकर्ते यावरून निश्चितपणे अमळनेर येथील राजकीय गणिते बदलत असून येत्या काही दिवसात याचे परीणाम देखील पहावयास मिळतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button