Mumbai

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ लॉकडाऊनमध्ये करणाऱ्या तीन आरोपींना रु.५३.४८.९६०/किंमतीच्या प्रतिबंधीत व अन्य मुद्देमालासह अटक

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ लॉकडाऊनमध्ये करणाऱ्या तीन आरोपींना रु.५३.४८.९६०/किंमतीच्या प्रतिबंधीत व अन्य मुद्देमालासह अटक

पी व्ही आनंद

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ लॉकडाऊनमध्ये भरमसाठ किंमतीत विक्री करण्यासाठी टेम्पो व गोडाऊन मध्ये साठा करून ठेवणाऱ्या तीन आरोपींना रु.५३.४८.९६०/किंमतीच्या प्रतिबंधीत व अन्य मुद्देमालासह अटक करण्यात कक्ष-१०गुन्हे शाखेस यश.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, तंबाखू जव्य पदार्थ, अन्य अंमली पदार्थाचे बेकायदेशीरनिर्मिती, वापर, पुरवठा व वितरण तसेच सेवना
तपासणी व कारवाई करण्यात येते. कक्ष-१० गुन्हे प्रकटीकरण शाखा, मरोळ, अंधेरी, मुंबई येथील पोलीस पथक यांना अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करपारे इसम व प्रतिबंधित पदार्थाचा साठा करण्याची ठिकाणे याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.सध्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाकरीता शासनाणे लॉकटाउन चालू ठेवलेला आहे. या कालावधीत अत्यावश्यक वस्तू व अन्नपदार्थांचा नागरीकांना पुरवठा व्हावा याकरीता शासनाचे
आदेशान्वये काही व्यक्ति व संस्थांना त्यांचे वाहनावर लावण्याकरीता तात्पुरते परवाने वाटप करण्यात आलेले आहेत.अशा परवान्यांचा गैरवापर करून शिवाजी नगर, गोवंडी, मुंबई परीसरात काही इसम प्रतिबंधित अन्नपदार्थाची स्वतःच्या आर्थिक गैरफायद्याकरीता वाहतुक व साठा करून विक्री करीत असल्याची विश्वसनीय बातमी
०७/०५/२०२० रोजी कक्ष-१० येथील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सुनिल माने यांना प्राप्त झाली होती. सदर बातमीवी शहानिशा करून कायदेशीर कारवाईकरीता अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह नियोजनबध्द छापा बाबतची कारवाई करण्यात आली.दिनांक ०७/०५/२०२० रोजी ९० फूट रोड, गजानन कॉलनी, शिवाजी नगर, गोवंडी, मुंबई येथे बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणेचा टाटा एस् मॉडेलचा टेम्पो क्र. एमएच.०४.जीएफ. ७६८२ पोलीस व पंच यांना
दिसून आला. सदर टेम्पोच्या पुढील काचेवर डाव्या बाजूकडे शासन मान्यतेने दिलेला पास चिटकविण्यात आला होता व त्यावर भाजीपाला व फळे वाहतुकीकरीता असे नमूद करण्यात आले होते. त्या टेम्पोच्या बाजूस दोन इसम संशयितरित्या वावरताना दिसून आल्याने पोलीस पथकाने घेराव टाकून टेम्पोसह खालील वर्णनाच्या दोन इसमांना जागीच अटकावून ठेवले. त्यावेळी तेथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी हजर झाले. त्यांच्या समक्ष ताब्यात घेतलेल्या इसमांकडे केलेल्या चौकशीत या अवैध व्यवसायात अव्य ८ ते १० इराम सहभागीअसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.ताब्यात घेतलेले इसम:१) एक पुरुष, वय ३८ वर्षे, राहणार-प्लॉट नं.३, शिवाजी नगर, गोवंडी, मुंबई २) एक पुरूष, वय ३१ वर्ष, अली उमर स्ट्रिट, नळबाजार, मुंबई.अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सदर टेम्पो मधील बंद मालाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ३४ बॅग
दिसून आल्या. प्रत्येक बॅग मधील नमुना पाकीटे काढून आणि ती उघडून अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा आणि तंबाखू मिश्रीत सुगंधित सुपारी, नझर पानमसाला, एक्का पान मसाला असा
प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा तसेच गोल्डप्लेक सिगारेट, ओम तंबाखूचा साठा दिसून आला. जप्त केलेल्या मालाची किंमत रू. २१,४८,९६०/- आणि टेम्पोची किंमत रु. ४,00,000/- अशी असून एकूण किंमत रू.२५,४८,९६०/- इतकी आहे…
वर नमूद इसमांनी अन्न सुरक्षा मानदे कायदा तसेच अन्न सुरक्षा आयुक्त यांचे आदेशांचा भंग केला असूनसध्या कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतांना तसेच कोरोना विषाणू संसर्ग होवू नये म्हणून शासनाने
विविध बाबीवर प्रतिबंध केलेला असतांना त्यांच्याकडील टेम्पोवर भाजीपाला व अन्नपदार्थ वाहतुकीचा पास चिकटयून
शासनाची फसवणूक केलीव बेकायदेशिरपणे गुटखा पानमसाला व सुगंधीत तंबाखू हे अन्न पदार्थ मानवी आरोग्यास असुरक्षित, घातक/अपायकारक असल्याची जाणीव असूनही संगनमताने प्रतिबंधीत अन्न पदार्थाच्या विक्रीसाठी
वाहतुक, साठा केला. यास्तव अग्ण सुरक्षा अधिकारी यांचे फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे दिनांक ०७/०५/२०२० रोजी गुरक्र. २१३/२०२० कलम अव्या सुरक्षा मागदे कायदा-२००६, मधील कलम २६(पप)१,
२७(पप)४, २७(पपप) सह कलम ३(१)(22)(अ) शिक्षा कलम ५९ तसेच कलम २६ (२)(४) सहवाचन अन्न सुरक्षा आयुक्त यांचे दिनांक १९ जुल २०१९चआदेश,कलम २७(३)(डा),(इ), शिक्षा कलम ५९ कलम ३२८, ४२०,२६९, १७९, १८८, २७३, १२०(ब) सह कलम ५२ आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियमसह साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमाचे कलम २, ३, ४ अव्वये गुन्हा नोंदवून वर नमुद ताब्यात घेतलेल्या २ आरोपीना अटक केली. अटक आरोपीकडे गुन्हयातील अन्य आरोपी आणि अधिक प्रतिबंधीत मालाबाबत तपास करीत असतांना
मिळालेल्या माहितीवरून खालील नमूद वर्णनाच्या एका इसमास दिनांक ०८/०५/२०२० रोजी शिवाजीनगर गोवंडी परीसरातून ताब्यात घेवून या गुव्हयात अटक केली आहे. अटक केलेला इसम:१) एक पुरुष, वय २८ वर्षे, राहणार-प्लॉट नं.१२/जे, शिवाजी नगर गोवंडी, मुंबई. गुन्हयात अटक केलेल्या तीन आरोपीना पोलीस कोठडी रिमांडकामी मा. न्यायालयात हजर केले असता
त्यांना दि. १०/०५/२०२० रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.
गुब्हयात अधिक तपास चालू असतांना दि. ०८/०५/२०२० रोजी अटक केलेल्या आरोपीने पंच आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांचे समक्ष केलेल्या निवेदनात शिवाजीनगर गोवंडी परीसरातील आरोपीच्या गोडावून मधून एकूण
१४ मोठे बंडल “नझर गुटखा” बाजार भावाप्रमाणे किं. रु. २८,00,000/- जप्त केला आहे.

प्रतिबंधित अन्नपदार्याबाबत अन्न व औषध प्रशासन यांचेमार्फत अधिक कार्यवाही चालू असून गुन्हयाचा तपास सपोनि. वाहीद
पठाण हे करीत आहेत. सदर कारवाईत युनिट १० च्या पथकाने आतापर्यंत एकूप रू. ५३,४८,९६०/- किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.
सदरची यशस्वी कारवाई मा. सह पोलीस आयुक्त (गुव्हे) श्री. संतोष रस्तोगी, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. अकबर पठाण, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-१० गुन्हे प्रकटीकरण शाखा येथील प्रभारी पोलीस निरीक्षक सुनिल माने, पोनि. नामदेव शिंद, सपोनि. वाहीद
पठाण, धनराज चौधरी, अफरोज शेख तसेच अंमलदार मोहन घाणेकर, अविनाश चिकणे, अजित पाटील, जगदीश धारगळकर, संतोष वंजारी, चंद्रकांत गवेकर, सुनिल रोकडे, रमेश नलावडे, श्रीमती दया खाडे, विनायक जगताप,
रविंद्र राठोड या पथकाने पार पाडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button