sawada

धककादायक : सावदा येथे कोरोनाचा प्रकोप । एकाच कुटुंबातील ३ जणाचा दुर्दैवी मृत्यु । अधिकारी व लोकप्रतिनिधीची बैठक

धककादायक : सावदा येथे कोरोनाचा प्रकोप । एकाच कुटुंबातील ३ जणाचा दुर्दैवी मृत्यु । अधिकारी व लोकप्रतिनिधीची बैठक

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मागील वर्षी जून – जुलै प्रमाणे पसरत असून यावेळी त्याची तीव्रता अधिकच दिसत असून गेल्या १० ते १२ दिवसा पूर्वी एकाच कुटुंबातील ६ ते ७ जण पोजेटिव्ह आले होते
येथील प्रतिष्ठित असे परदेशी यांचे एकत्रित कुटुंब असून या कुटुंबातील ६ ते ७ जण मागील १०ते १५ दिवसात एकामागुन एक कोरोना पोजेटिव्ह आले यानंतर त्यांना उपचारार्थ जळगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचे वर तेथे उपचार सुरु होते
दरम्यानच्या काळात प्रथम या कुटुंबातील किशोर परदेशी यांच्या पत्नी वय ४५ यांची प्रकृती खलावली व त्यांचे २१ रोजी त्यांचे निधन झाले त्यापाठोपाठ परदेशी यांच्या आई वय ९० यांचे घरी वृद्धापकाळाने निधन झाले यानंतर पती किशोर परदेशी यांचे देखील २४ रोजी निधन झाले सकाळी लहान भाऊ किशोर परदेशी यांचे निधनाची बातमी येत नाही तोच त्यांचे मोठे भाऊ व पत्रकार कैलास परदेशी यांचे देखील निधन झाल्याने यापरिवारावर एकच दुखा:ची विज कोसळी, परदेशी परिवातील ४ जण ४ दिवसाचे आत निधन झाले यामुळे सावदा व परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे
दरम्यान आज दी ,२५रोजी नगरपालिकेत प्रांतअधिकारी कैलास कडलग व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचे प्रमुख उपस्थित लोकप्रतिनिधि यांची एक बैठक घेण्यात आली यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी शहरातील परिस्थिति व उपाय योजना या बाबत माहिती दिली तर तहसीलदार देवगुणे यांनी संपूर्ण लॉकडाउन (जनता कर्फ्यू) करणे यापेक्षा सर्वानि नियम पाळा तसेच सायंकाळी 7 नंतर कडक संचार बंदी पाळा असे सांगितले, नगरसेवक राजेंद्र चौधरी व फिरोज खान पठान यांनी देखील विचार मंडताना शहरात जनतेत जनजागृती बाबत सुचविले, तसेच कोविड सेंटर शहरात असल्यास लोकांचे मनातील भीति कमी होईल व लोक टेस्टिंग साठी येतील असे देखील सुचविले, प्रांतअधिकारी कैलास कडलग यांनी ज्यास त्रास आहे त्याने लवकर टेस्टिंग करा, जेने करून लवकर उपचार होऊन मृत्यु दर कमी होईल,बेशीस्त नगरिक यांना वेळ पडल्यास दंड करा स्वता:ची, कुटुंबाची व समाजाची जबादारी आपल्यावर असल्याने आपण स्वत: जबादारीने वागा, यावेळी नगराध्यक्षा सौ. अनीता येवले, स.पो.नी, देवीदास इंगोले, मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरसेविका रंजना भारंबे, जयश्री नेहेते, लीना चौधरी, नंदाबाई लोखंडे, मीनाक्षी कोल्हे, शबाना तडवी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठान, सतीष बेंडाळे, किशोर बेंडाळे, सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील, शहरातील डॉक्टर, पत्रकार व मान्यवर उपस्थितित होते,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button