नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा ; गुलाबराव पाटलांचे एकनाथ खडसेंना आवाहन
रजनीकांत पाटील
नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा”, असं आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना केले आहे . “मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपानंतर गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांना संपवण्याचे कारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने रचले आहे. मात्र एकनाथ खडसे आरोप करतात आणि गप्प बसतात, असे व्हायला नको. नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा”, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.
“माझ्यावर जी मीडिया ट्रायल झाली होती ,ते या बारभाई कारस्थानतूनच झाली. देवेंद्र फडणवीस यांनीच माझे तिकीट कापले. सर्व कटकारस्थान यांचेच आहे. मी सर्व बाबी नानासाहेब फडणवीस यांचे बारभाई कारस्थान या पुस्तकात देणार आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.






