Dharangaw

? भोद बु. येथे तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

भोद बु. येथे तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

पिंप्री खु .ता धरणगाव

रजनीकांत पाटील

पिंप्री. खुर्द येथून जवळच असलेल्या भोद बु येथील अमरसिंग भीमसिंग पाटील वय वर्ष 20 या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मागील आठवड्यात परिसरात बऱ्या पैकी पावसाने हजेरी लावल्याने नदीस पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या मुळे परिसरातील मुले नदीत पोहण्यासाठी नेहमीच जात असतात.अमरसिंग पाटील व काही मित्र पाण्यात पोहण्यासाठी गेले असता.पाण्याचा अंदाज न आल्याने आमरसिंग पाटील याचा दुर्दैवाने अंत झाला. त्याचे वडील भीमसिंग पाटील हे शेती व्यवसाय व भोद बु येथे ग्रामपंचायत शिपाई म्हणून काम करतात.
आमरसिंग हा त्यांच्या कुटुंबातील एकटा मुलगा गेल्याने कुटुंबात परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे.
घटना कळताच गावाचे पोलिस पाटील, सरपंच तसेच भोद बु, भोद खु, पिंप्री खु येथील तरुण व नागरिक यांनी शोध कार्यास भरपूर मेहनत केली. परंतु दुर्दैवाने अमरसिंग मिळे पर्यंत त्याची प्राणज्योत मावळली होती.धरणगाव सिव्हिल हॉस्पिटल ला शवविच्छेदन करण्यात आले.

परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत असून तरुणांनी सावध असणे गरजेचे आहे असे जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ सांगत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button