Pandharpur

सोलापूरातील पदविका युवा महोत्सवामध्ये स्वेरीला सर्वसाधारण विजेतेपद सांघिक व वैयक्तिक स्वरूपात एकूण ४९ पुरस्कार

सोलापूरातील पदविका युवा महोत्सवामध्ये स्वेरीला सर्वसाधारण विजेतेपद सांघिक व वैयक्तिक स्वरूपात एकूण ४९ पुरस्कार

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर- सोलापूर येथील हरीभाई देवकरण प्रशाला येथे पार पडलेल्या पदविका अभियांत्रिकी युवा महोत्सवामध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले असून सांघिक व वैयक्तिक स्वरूपात एकूण ४९ पुरस्कार मिळविले. ‘स्वेरी’ महाविद्यालय हे विद्यार्थी प्रवेश संख्येत, वार्षिक परीक्षेच्या निकालात आणि प्लेसमेंटमध्ये अनेक वर्षापासून अग्रेसर आहे. आता स्वेरी महाविद्यालयाने सोलापुरात झालेल्या ‘युवा महोत्सवा’ मध्ये आघाडी मारल्यामुळे विजेत्या स्पर्धकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
यामध्ये सांस्कृतिक विभागातील विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेले स्पर्धक विद्यार्थी याप्रमाणे केदार पुजारी (वादविवाद–हिंदी) मकरंद खिस्ते (निबंध लेखन), मानसी चाळकीकर व नागेन्द्रकुमार नायकोंडे (कवितावाचन), वैष्णवी धांडोरे(रांगोळी), विशाल डांगे व मेघा बाबर (केश शैली), स्नेहा हिंगमिरे (भेटवस्तू सजावट), स्नेहा हिंगमिरे व स्वेरी टीम (कोशिंबीर सजावट), तेजस मोरे (वक्तृत्व मराठी), तसेच द्वितीय क्रमांक मिळविलेले स्पर्धक विद्यार्थी या प्रमाणे मानसी चाळकीकर (वक्तृत्व इंग्रजी), जितेंद्र पाटील (वाद-विवाद), मानसी चाळकीकर (कवितावाचन), स्वरांजली देशमुख (रांगोळी), दीप्ती पवार (केस शैली), स्वप्नील शिंदे (व्यंगचित्र), स्नेहा हिंगमिरे (फुले सजावट) तसेच तृतीय क्रमांक – सचिन खताळ (वाद विवाद मराठी), बळीराम शिंदे (कविता वाचन मराठी), प्रतीक मोरे (स्पॉट फोटोग्राफी), अनिशा नागटीळक (व्यंगचित्र), प्रीती मोरे (पोस्टर बनविणे), तांत्रिक विभाग- सचिन खताळ (अभियोग्यता चाचणी), सिद्धेश परदेशी (प्रकल्प कल्पना), प्रसाद डीसले (ऑटोकॅड), आशुतोष कोळी(प्रकल्प कल्पना), प्रवीण आयरे (ऑटोकॅड), हेमंत खांडेकर (अभियोग्यता चाचणी), अजिंक्य बहिरट (प्रकल्प कल्पना), सामाजिक विभाग- ज्ञानेश्वरी दास (टाकाऊ पासून टिकाऊ बनविणे व पक्षी घर बनवणे), प्रशांत सोनार (अभियोग्यता चाचणी), खेळ विभाग- रस्सीखेच (निशा शिंदे, राणी खांडेकर, ऋतुजा हेंबाडे, प्रगती बेंद्रे, रोहिणी चव्हाण, कादंबरी पाटील, ऋतुजा जाधव, श्रद्धा पवार, धनश्री टरले, निशा गाडेकर, अवंतिका भोसले), हॉलीबॉल प्रथम (दीपक शिंदे, सुरज खिलारे, किरण माने, अभिजीत झंजे, आदित्य गोडगे, भास्कर धनवले, ओंकार कोळी, स्वप्नील जाधव, श्रीराज गायकवाड, केतन पवार, साहिल गरांडे, विनायक मलशेट्टी), हॉलीबॉल (ऋतुजा हेंबाडे, वैष्णवी भोसले, निशा शिंदे, दिप्ती चौगुले, अवंतिका भोसले, प्रगती नागणे, सोनाली खिलारे, स्वप्नाली काटकर, ऋतुजा जाधव, राणी खांडेकर, आकांक्षा झाडे, दिपाली डीकळे), खोखो (संकेत भोसले, आदित्य घाडगे, किरण माने, नितीन बंडगर, कुणाल उकिरडे, दीपक काळे, अभिजीत नाळे,ओंकार भोसले, शिंदे गोरख, तुषार गोरे, मोरे मारुती, शोएब मुलानी), टेबल टेनिस( स्वप्नील जाधव, अभिजीत झंजे, प्रसाद घोडके, धनंजय तुपे), दीपक शिंदे (रिले ४ बाय १००), द्वितीय पारितोषिक- कबड्डी(राणी खांडेकर, निशा शिंदे, सुनिता डांगे, धनश्री तरडे, प्रणिता करपे, अपेक्षा नागणे, ऋतुजा हेंबाडे, श्रद्धा पवार, प्राजक्ता फाळके, वैष्णवी भोसले, कादंबरी पाटील, प्रगती राठोड) आशुतोष कोळी व दीक्षा घाडगे (कॅरम), फुटबॉल (कणाद पाटील, केतन पवार, समर्थ वानकर, प्रथमेश पाटील, प्रज्वल बैरागी, आदित्य पाटील, अजित यादव, ओंकार अधटराव, अक्षय रुहाडे ,साऊद्दीन जासीन, ओंकार बसाटे, श्रीराज गायकवाड), खोखो (साक्षी यमगर, ऋतुजा जाधव, अवंतिका भोसले, श्रद्धा पवार, सुनिता डांगे, कादंबरी पाटील, अपेक्षा नागणे, प्रगती राठोड, ऋतुजा हेंबाडे, वैष्णवी भोसले, राणी खांडेकर, स्वप्नाली काटकर),दीपक शिंदे व अवंतिका भोसले (ॲथलेटिक्स १०० मीटर) दीपक शिंदे (अथलेटिक्स २०० मीटर), प्रगती बेद्रे (रिले ४ बाय १००) दीपक शिंदे (अथलेटिक्स ४०० मीटर) या विजेत्यांना स्मृतिचिन्ह, पदके आणि प्रमाणपत्रे देवून युवा महोत्सवाच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना सांस्कृतिक समन्वयक प्रा. एस. डी. भिंगारे, क्रीडा समन्वयक प्रा. एच.डी.ऐवळे, प्रा. ए. सी. वसेकर, प्रा. ए. एस.येडगे, प्रा. एस. एस. कुरे, प्रा. ए. ए. पवार, तृप्ती भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे पदाधिकारी,इतर विश्वस्त, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, प्रा. एस. एम.कावळे तसेच स्वेरी संचलित इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
छायाचित्र-सोलापूरात झालेल्या पदविका अभियांत्रिकी युवा महोत्सवात स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, प्रा. देशमुख, प्रा. भिंगारे, प्रा. कुलकर्णी, प्रा. भातलवंडे, प्रा. गायकवाड, प्रा. भिसे, प्रा. ऐवळे, प्रा. वसेकर, प्रा.येडगे, प्रा. कुरे, प्रा.पवार व इतर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button