Maharashtra

शिवछत्रपती समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार बाबासाहेब पावसे यांना जाहीर

शिवछत्रपती समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार बाबासाहेब पावसे यांना जाहीर

लक्ष्मण कांबळे

संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मान नेतृत्त्वाचा सन्मान कतृत्वाचा शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन 2020 या भव्य दिव्य दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहे . राज्यस्तरीय शिवछत्रपती समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार सरपंच सेवा संघाचे संस्थापक राज्य सरचिटणीस बाबासाहेब यादवराव पावसे रा. हिवरगांव पावसा ता. संगमनेर यांना जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श तसेच ग्रामविकासात व सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचा प्रयत्न करणारा युवा सामाजिक कार्यकर्ता तसेच पत्रकारीतेच्या क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असून सर्व सामान्य माणसाला मदत होईल व शेतकरी वर्गाला विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. संजीवनी विकास संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच पत्रकारीता अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते या वर्षी चा राज्यस्तरीय पुरस्कार श्री पावसे यांना संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप सचिव गोरक्ष भवर यांनी नुकतीच एक पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. सदर पुरस्कारा मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button