स्वेरी कॉलेजमधील उज्वल निकालाची परंपरा पाहूनच १०० टक्के अॅडमिशन होतात
स्वेरी पॉलिटेक्निक कॉलेजमधील १३ विद्यार्थी १०० पैकी १०० पैकी गुण मिळवून राज्यात प्रथम
प्रतिनिधी रफिक आत्तार)ल
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या हिवाळी २०१९ परीक्षेत पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) कॉलेजच्या एकूण ११३ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण तर ८० टक्के ते ८९.९९ टक्के पर्यंत ४६४ विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त करून नेत्रदिपक यश मिळवले. सलग दुसऱ्या वर्षीही १०० टक्के प्रवेश पूर्ण झालेले महाराष्ट्रातील एकमेव खाजगी कॉलेज असून उज्वल निकालामुळे कॉलेजचा व संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रभर झाला असून स्वेरी पॉलिटेक्निक कॉलेजमधील उज्वल निकालाची परंपरा पाहूनच १०० टक्के अॅडमिशन होतात.
प्रथम वर्षातील गणित (एम.वन) या विषयात तब्बल ७ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० पैकी गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर याच विषयात ९७ व त्यापेक्षा जास्त गुण १६ विद्यार्थ्यांनी मिळवले.द्वितीय वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेतील ‘स्ट्रेंग्थ ऑफ मटेरीअल(सॉम )’ या विषयामध्ये आर्या आराध्ये, प्रसाद डिसले, हेमंत खांडेकर, केशव सरडे, प्रकाश सोलनकर यांनी १०० पैकी १०० पैकी गुण मिळवून तर याच शाखेतील विद्यार्थी प्रसाद डिसले यांनी ‘मेकॅनिकल ड्रॉईग’ या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. स्वेरी पॉलिटेक्निक कॉलेजमधील १३ विद्यार्थी विविध विषयात १०० पैकी १०० पैकी गुण मिळवून राज्यात प्रथम आले आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेतील द्वितीय वर्षातील एकूण ४ विद्यार्थांनी ‘स्ट्रेंग्थ ऑफ मटेरीअल (सॉम )’ व ‘इंजिनिरिंग मेट्रोलोजी’ या विषयामध्ये ९७ पेक्षा जास्त गुण मिळवले.द्वितीय वर्षातील विविध शाखेतील विविध विषयामध्ये एकूण ११ विद्यार्थांनी ९७ पेक्षा जास्त गुण मिळवले तर तृतीय वर्षातील विविध शाखेतील विविध विषयामध्ये एकूण २७ विद्यार्थांनी ९७ पेक्षा जास्त गुण मिळवले अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी दिली. यावर्षी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका या वर्गाचा ऑल क्लियर निकाल ८०.६३ टक्के एवढा लागला. यामध्ये प्रथम क्रमांक हर्षाली शिवाजी बाबर (९५.५७ टक्के), द्वितीय प्रसाद धनंजय डोंबे (९५.२९ टक्के), तृतीय निलेश धनाजी काशीद (९४.८६ टक्के) यांनी पटकाविला. द्वितीय वर्षामध्ये संपूर्ण शाखेतून प्रथम क्रमांक शर्वरी राजाराम गोडगे (९६.४४ टक्के), द्वितीय विशाल भगवान सागर (९५.७३ टक्के), तृतीय गीतांजली महादेव चव्हाण (९४.७५ टक्के) यांनी पटकावला तर तृतीय वर्षामध्ये संपूर्ण शाखेतून प्रथम क्रमांक अजय नागेश भोगांवकर (९५.६० टक्के), द्वितीय मारुती बलिराम पिंपळे(९५.४०टक्के), तृतीय प्रमोद हरी लेंडवे (९५.१० टक्के) यांनी पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर.बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी, विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ तसेच संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ.






