Erandol

रुग्णसेवक विक्की खोकरे यांना “जिवनदाता”पुरस्कार जाहीर..!

रुग्णसेवक विक्की खोकरे यांना “जिवनदाता”पुरस्कार जाहीर..!

एरंडोल – येथील मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व गोर गरिबांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे रुग्णसेवक विक्की खोकरे यांचा सेवाकार्याचा गौरव म्हणून मुंबई येथील राजे छत्रपति फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय “जिवनदाता”पुरस्कार जाहिर करण्यात आले…
विक्की फकिरा खोकरे हे गेल्या दहा वर्षांपासून पीडित रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करत आहेत आज पर्यंत यांना हजारो हृदय पीडित व कॅन्सर ग्रस्त रुग्णांचे विनामुल्य शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्याचे मानववादी कार्य केले आहे
त्याचा या पुरस्कारा बद्दल आमदार आबासाहेब चिमणराव पाटील, शालिकभाऊ गायकवाड, रमेश अण्णा महाजन, विजय अण्णा महाजन, किशोर निबाळकर,राजेद्र चौधरी, आनंदा चौधरी आदींनी अभिनंदन केले
सदर पुरस्कार सोहळा 31 जानेवारी रोजी रगंश्री नाट्य गृहात होणार असल्याचे कळविण्यात आले आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button