Maharashtra

पिडीत महिलेला न्याय मिळवून द्या व आरोपी कठोर शिक्षा करा

पिडीत महिलेला न्याय मिळवून द्या व आरोपी कठोर शिक्षा करा, गोंधळी समाजाच्या वतीने निवेदन

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद : उमरगा तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे तीन मुलांसह राहणारी भटक्या विमुक्त समाजांपैकी गोंधळी समाजाची लक्ष्मी बालाजी भांडे या महिलेवर स्थानिक गुंड प्रदीप दिनकर खोपकर याने दी 20 जून रोजी तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.

तलवारीचा धाक दाखवून सदर महिलेवर,मुलांना व तिच्या पतिला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार आणि अमानवी छळ करत होता असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या जाचास कंटाळून पीडित महिला प्रतिकार करत असताना प्रदीप यांनी धारधार शस्त्राने या महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याबाबात या निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणी प्रदीपला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अन् पीडित महिलेला व तिच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी उमरगा गोंधळी समाजाच्या वतीने दि 24 जून रोजी उमरगा तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर गरुडझेप फाऊंडेशन चे संस्थापक नरहरी गरुड,बालाजी माद्रे, विक्रम पाचंगे, अविनाश साळुंखे,राजेंद्र साळुंखे, संजय चव्हाण,अरुण इगवे, मारुती भोसले आणि मारुती साळुंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button